वुईवर्क इंडिया मॅनेजमेंट लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री शुक्रवार 03 ऑक्टोबर 2025 पासून होणार सुरू
वुईवर्क इंडिया मॅनेजमेंट लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री शुक्रवार 03 ऑक्टोबर 2025 पासून होणार सुरू
· वुईवर्क इंडिया मॅनेजमेंट लिमिटेड (“कंपनी”)च्या प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 615 रुपये ते प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) 648 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.
· प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक बुधवार, 01 ऑक्टोबर 2025 आहे.
· बोली/ऑफर शुक्रवार 03 ऑक्टोबर 2025 रोजी खुली होईल आणि मंगळवार, 07 ऑक्टोबर 2025 रोजी बंद होईल.
· बोली किमान 23 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 23 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल
· रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) लिंक: https://wework.co.in/investors-relations/Red%20Herring%20Prospectus.pdf
राष्ट्रीय, 29 सप्टेंबर 2025: वुईवर्क इंडिया मॅनेजमेंट लिमिटेड (“कंपनी”)च्या प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) प्राथमिक समभाग विक्री (“Offer”) शुक्रवार 03 ऑक्टोबर 2025 रोजी खुली करण्याचा प्रस्ताव आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक त्याआधी एक दिवस म्हणजेच बुधवार, 01 ऑक्टोबर 2025 आहे. बोली/ऑफर मंगळवार, 07 ऑक्टोबर 2025 रोजी बंद होईल.
प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 615 रुपये ते प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) 648 रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 23 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्याच्या 23 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल.
कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्री ऑफरमध्ये 46,296,296 पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (“OFS”) आहे. ऑफर फॉर सेल मध्ये 35,402,790 पर्यंतचे इक्विटी शेअर्स एम्बसी बिल्डकॉन एलएलपी (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) आणि 10,893,506 पर्यंतचे इक्विटी शेअर्स 1 एरियल वे टेनंट लिमिटेड (“गुंतवणुकदार विक्री समभागधारक”) यांचे आहेत.
ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित नियम 6(2) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या किमान 75% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये समाविष्ट केले जातील. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल. जर ऑफरच्या किमान 75% भागाचे QIBs साठी वाटप होऊ शकत नसेल तर संपूर्ण विहित रक्कम रीफंड केली जाईल. तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. (“Non-Institutional Investors” or “NIIs”) (the “Non-Institutional Portion”) त्यापैकी एक तृतीयांश भाग 200,000 रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वर नमूद केलेल्या कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग दुसऱ्या इतर उप-श्रेणीतील गुंतवणूकदारांना वाटप केलेला असू शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. प्रत्येक बिगर-संस्थात्मक गुंतवणूकदाराला वाटप हे किमान अर्ज आकारापेक्षा कमी असणार नाही. बिगर-संस्थात्मक भागातील इक्विटी शेअर्सच्या उपलब्धतेवर हे अवलंबून असेल आणि उर्वरित उपलब्ध इक्विटी शेअर्स असल्यास यासंदर्भात SEBI ICDR नियमावलीतील अनुसूची XIII मध्ये नमूद केलेल्या अटींनुसार त्याचे प्रमाणानुसार वाटप केले जाईल.पुढे, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या 10% पेक्षा जास्त नसलेला भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना उपलब्ध होईल. ऑफर प्राइस इतक्या किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या बोलीवर हे लागू असेल.
येथून पुढे, पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना त्यांची वैध बोली ऑफर किंमती एवढी किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास इक्विटी शेअर्सचे प्रमाणात वाटप केले जाईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.
कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) (BSE आणि NSE एकत्रितपणे “स्टॉक एक्सचेंज”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.
जेएम फायनान्शीयल लिमिटेड, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड आणि 360 ONE WAM लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.
येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.
Comments
Post a Comment