'किड्स डे @सॅमसंग - २०२५'मध्ये कामाचे ठिकाण नाविन्यतेचे प्लेग्राऊंड बनले
'किड्स डे @सॅमसंग - २०२५'मध्ये कामाचे ठिकाण नाविन्यतेचे प्लेग्राऊंड बनले
गुरूग्राम, भारत - ऑगस्ट २५, २०२५ - सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज अद्वितीय साजरीकरण 'किड्स डे @सॅमसंग - २०२५'चे आयोजन केले, ज्यामध्ये कर्मचारी, त्यांची मुले व पत्नी एकाच छताखाली आहे आणि त्यांनी सॅमसंग कुटुंबाचा भाग असण्याच्या अभिमानाचा अनुभव घेतला.
गुरूग्रामध्ये सॅमसंगच्या कॉर्पोरेट कार्यालयामध्ये या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, जो कुटुंबांसाठी दीर्घकालीन आठवणी निर्माण करण्यासाठी डिझाइन करण्यात आला होता, तसेच भावी पिढीला स्वप्न पाहण्यास, नाविन्यता आणण्यास आणि तंत्रज्ञानाला एक्स्प्लोअर करण्यास प्रेरित करण्यात आले.
सॅमसंग कुटुंबाचे साजरीकरण
या उपक्रमाने आई-वडिलांसोबत आलेल्या मुलांना सॅमसंगच्या विश्वाचा अनुभव धेण्याची संधी दिली, तसेच त्यांना त्यांचे पालक करत असलेले काम पाहण्यास मिळाले आणि कंपनीच्या नाविन्यता व केअर संस्कृतीचा अनुभव मिळाला. कर्मचाऱ्यांच्या जोडीदारांनी देखील या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला, ज्यामधून विस्तारित कुटुंबे व एकतेचे खरे साजरीकरण पाहायला मिळाले.
''किड्स डे @सॅमसंग कुटुंबांना संधी देण्यासोबत त्यांच्यामध्ये नाविन्यतेच्या विश्वाबाबत जिज्ञासूवृत्ती जागृत करते. आमच्या कामाच्या ठिकाणी कुटुंबातील सदस्यांना आणत आमची त्यांच्यामध्ये सॅमसंगचा भाग असण्याचा अभिमान जागृत करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. यंदाच्या साजरीकरणामधून भावी पिढीला निर्माते, विचारवंत व नवप्रवर्तक बनण्यास प्रेरित करण्याप्रती, तसेच आमच्या जिवलग सॅमसंग कुटुंबाचे नाते अधिक दृढ करण्याप्रती आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न दिसून येतो,'' असे सॅमसंग इंडियाचे पीपल टीमचे प्रमुख रिषभ नागपाल म्हणाले.
तरूण विचारवंतांना प्रेरित करण्यात आले
'नो सॅमसंग' अनुभवाचा भाग म्हणून मुलांनी बिझनेस एक्स्पीरिअन्स स्टुडिओला भेट दिली, जेथे त्यांना सॅमसंगच्या अत्याधुनिक उत्पादनांची, तसेच स्मार्टथिंग्ज इकोसिस्टमची लाइव्ह प्रात्यक्षिके पाहायला मिळाली.
मुलांनी मिनी सीईओ चॅलेंजमध्ये देखील सहभाग घेतला, 'मी सॅमसंगचा सीईओ असतो तर कोणते उत्पादन लाँच केले असते?' या विषयावर विचारविनियम केले. मुलांना सर्जनशीलपणे विचार करण्यास आणि भावी तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन मांडण्यास प्रेरित करण्यात आले.
कुटुंबांनी पुढील गोष्टींचा अनुभव घेतला:
· सॅमसंग स्टुडिओ - सॅमसंग उत्पादन जाहिराती कशाप्रकारे तयार करते यावर पडद्यामागील झलक.
· जिम अँड योगा रूम - यामधून कंपनी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येते.
· पॅरेण्ट्स वर्कप्लेस - येथे मुले अभिमानाने त्यांच्या पालकांच्या कामाच्या ठिकाणांना पाहतात आणि सहकाऱ्यांच्या कुटुंबांना भेटतात, ज्यामुळे नातेसंबंध आणि साहचर्य मजबूत होते.
धमाल, खेळ आणि एकजूटता
उत्सवी उत्साहाची भर करण्यासाठी किड्स प्ले झोन उभारण्यात आले होते, ज्यामध्ये धमालपूर्ण स्टॉल गेम्स, टॅट्टू आर्ट, कॅरिकेचर स्केचेस्, केसांची वेणी बनवणे व नेल पेन्टिंगचा समावेश होता. मुलांना दिवसभर हास्य, खेळ व उत्साहाचा आनंद मिळाला, तसचे मुलांनी गूडीज जिंकले आणि हलक्या-फुलक्या क्रियाकलापांमध्ये सहभाग धेतला.
मुलांना सॅमसंगच्या विस्तारित कुटुंबाप्रती कृतज्ञता व प्रेमाचे प्रतीक म्हणून विशेष स्नॅक बॉक्सेस् व सर्वोत्तम गिफ्ट हॅम्पर्स देत या साजरीकरणाचे समापन झाले.
Comments
Post a Comment