तूच माझा फ्रेंड आहेस बाप्पा.. मोरया’ गीताचे खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते अनावरण
तूच माझा फ्रेंड आहेस बाप्पा.. मोरया’ गीताचे खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते अनावरण
पुणे : गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रसारित करण्यात आलेल्या ‘तूच माझा फ्रेंड आहेस बाप्पा..मोरया’ या गीतातून सामाजिक प्रबोधनात्मक संदेश देण्यात आला आहे.
समाजमाध्यमावर या गीताचे लोकार्पण खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. खासदार कुलकर्णी यांच्या निवासस्थानी कार्यक्रम झाला.
कवी वलय मुळगुंद यांनी हे गीत लिहिले असून बालकलाकार आर्चिस नाडकर याने गायले आहे तर प्रसिद्ध संगीतकार उदय रामदास यांनी गीतसंगीतबद्ध केले आहे. प्रशांत शितुत यांची निर्मिती आहे.
Comments
Post a Comment