पुण्यातील संपूर्ण गदादे कुटुंबीयांचा अवयवदानाचा संकल्प*‘संजीव सोशल फाउंडेशन’ संस्थापिका छाया गदादे व परिवाराचा पुढाकार


*पुण्यातील संपूर्ण गदादे कुटुंबीयांचा अवयवदानाचा संकल्प*
‘संजीव सोशल फाउंडेशन’ संस्थापिका छाया गदादे व परिवाराचा पुढाकार  

पुणे : समाजासाठी एक प्रेरणादायी पाऊल उचलत मांजरी येथील संजीव सोशल फाउंडेशन च्या संस्थापिका छाया संजीव गदादे यांनी आपल्या संपूर्ण कुटुंबासह मृत्युपश्चात संपूर्ण अवयव व ऊती दान करण्याचा संकल्प केला आहे. गदादे परिवाराने भारत सरकारच्या ‘राष्ट्रीय अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संघटना’ कडे यासंदर्भातील शपथपत्र दाखल केले आहे.

महाराष्ट्र शासनाने ३ ऑगस्ट २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ‘अंगदान-जीवन संजीवनी अभियान’ अंतर्गत अवयवदान पंधरवडा जाहीर केला होता. या उपक्रमात अवयव दानाविषयी जनजागृती, गैरसमज दूर करणे आणि नागरिकांपर्यंत योग्य माहिती पोहोचविणे यावर भर देण्यात आला.

आपल्या मृत शरीराचा उपयोग इतरांना जीवनदान मिळण्यासाठी व्हावा या भावनेतून सुभाष गदादे, जयश्री गदादे, डॉ. संकेत गदादे आणि छाया गदादे यांनी एकत्रितपणे संपूर्ण देहदानाचा संकल्प केला. भारत सरकारने अवयव दानाची प्रक्रिया सुलभ केल्यामुळे काही मिनिटांतच कोणताही नागरिक अवयवदाता होऊ शकतो. अवयव व नेत्रदानाविषयीच्या गैरसमज दूर करण्याचे कार्य छाया गदादे अनेक वर्षांपासून सातत्याने करीत आहेत.

छाया गदादे म्हणाल्या, भारताची लोकसंख्या प्रचंड असली तरी स्पेन, अमेरिका, फ्रान्ससारख्या देशांच्या तुलनेत अवयव दानाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी पुढे येणे आवश्यक आहे. आमच्या कुटुंबाचा निर्णय निश्चितच समाजासाठी इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :