सॅमसंगने मुंबईमध्ये 'गॅलॅक्सी एम्पॉवर्ड'चा विस्तार केला, शिक्षकांना एआय आणि तंत्रज्ञान प्रशिक्षण देणार
सॅमसंगने मुंबईमध्ये 'गॅलॅक्सी एम्पॉवर्ड'चा विस्तार केला, शिक्षकांना एआय आणि तंत्रज्ञान प्रशिक्षण देणार
· हा उपक्रम शिक्षकांना प्रत्यक्ष सत्रे, तज्ञांच्या नेतृत्वांतर्गत कार्यशाळा आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून भावी तंत्रज्ञान कौशल्यांसह सुसज्ज करतो.
· गॅलॅक्सी एम्पॉवर्ड राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महत्त्वपूर्ण विचारसरणी, सर्जनशीलता आणि क्लासरूम नाविन्यतेला चालना देतो.
· सहभागींना विनामूल्य सर्वोत्तम कार्यशाळा, प्रमाणन आणि सॅमसंग डिवाईसेसवर स्पेशल ऑफर्स मिळतात.
गुरूग्राम, ऑगस्ट 26, २०२५ - सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज त्यांचा अद्वितीय समुदाय-केंद्रित उपक्रम गॅलॅक्सी एम्पॉवर्डच्या मुंबई चॅप्टरला लाँच केले. या उपक्रमाचा शिक्षक, मुख्याध्यापक व शालेय प्रशासनाला अत्याधुनिक डिजिटल साधने व आधुनिक अध्यापन पद्धतींसह अधिक कुशल करत वर्गांमध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा मनसुबा आहे.
नवी दिल्लीमध्ये हा उपक्रम यशस्वी ठरला, जेथे हा उपक्रम २५० हून अधिक शाळांपर्यंत पोहोचला आणि २,७०० हून अधिक शिक्षकांना प्रमाणित केले. या यशानंतर गॅलॅक्सी एम्पॉवर्ड आता देशाच्या शिक्षण परिसंस्थेवर दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षेसह भारताची आर्थिक व शैक्षणिक राजधानी मुंबईमध्ये आपली उपस्थिती वाढवत आहे.
मुंबईतील लाँच कार्यक्रमात महाराष्ट्र आणि शेजारच्या राज्यांतील २५० शाळांमधील ३५० हून अधिक शिक्षक व शाळाप्रमुख एकत्र आले, ज्यामधून या उपक्रमाला मिळत असलेली पसंती आणि शिक्षकांमध्ये व्यावसायिक विकासाची मागणी दिसून आली.
या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा, युनेस्को, पॅरिसमधील भारताचे राजदूत (अॅम्बेसेडर) व कायमचे प्रतिनिधी श्री. विशाल व्ही. शर्मा आणि सीबीएसईचे सचिव श्री. हिमांशू गुप्ता यांच्यासह सॅमसंग इंडियाचे वरिष्ठ प्रमुख, शिक्षण तज्ञ आणि सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आयजीसीएसई व राज्य मंडळांचे प्रतिनिधीत्व करणारे शेकडो शिक्षक उपस्थित होते.
''मुंबई भारतीय शिक्षणामधील नाविन्यतेच्या उत्साहाचे प्रतिनिधीत्व करते. गॅलॅक्सी एम्पॉवर्डसह आम्ही देशभरातील शिक्षकांना आवश्यक साधनांसह सुसज्ज करत आहोत, ज्यामुळे ते विद्यार्थ्यांशी अधिक संलग्न होतील, त्यांच्यामध्ये जिज्ञासूवृत्ती निर्माण करतील आणि वर्गांमध्ये अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणतील. आमचा २०२५ पर्यंत २०,००० शिक्षकांना सक्षम करण्याचा दृष्टिकोन आहे आणि मुंबई त्या प्रवासामधील महत्त्वपूर्ण टप्पा आहे,'' असे सॅमसंग इंडियाचे एमएक्स बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजू पुल्लन म्हणाले.
''भारत झपाट्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि सॅमसंग गॅलॅक्सी एम्पॉवर्ड सारख्या उपक्रमांमधून कुशल, भविष्यासाठी सुसज्ज देश घडवण्याप्रती आमची संयुक्त कटिबद्धता दिसून येते. प्रत्येक व्यक्तीने आपले सर्वोत्तम दिले तर कोणीही भारताला विश्व गुरू बनण्यापासून थांबवू शकत नाही. सॅमसंग यासंदर्भात प्रेरणदायी दिशा स्थापित करत आहे. शिक्षकांना सक्षम करत आपण एकत्रित समाजाच्या भविष्याला आकार देऊ आणि भारत नव्या उंचीवर पोहोचेल,'' असे महाराष्ट्राचे कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा म्हणाले.
शिक्षकांचे सक्षमीकरण, प्रेरणादायी वर्ग
गॅलॅक्सी एम्पॉवर्ड तीन मुलभूत आधारस्तभांवर डिझाइन करण्यात आला आहे:
१. एआय आणि तंत्रज्ञान अपस्किलिंग - स्थिर ऑनलाइन मॉड्यूल्स, सर्वोत्तम बूटकॅम्प्स व डिजिटल अध्यापन साधने, क्लासरूम अॅप्स आणि व्हर्च्युअल वातावरणाच्या माध्यमातून प्रत्यक्ष प्रशिक्षण.
२. अनुभवात्मक अध्ययन व प्रमाणन - पाठ रचना, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि शिक्षकांच्या स्वास्थ्यावर केंद्रित वैयक्तिक कार्यशाळा, मार्गदर्शन आणि प्रमाणन.
३. सहकारी नेटवर्किंग व समुदाय निर्मिती - शिक्षकांना विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि दीर्घकालीन व्यावसायिक विकास करण्यासाठी देशभरातील सहकारी, विचारवंत आणि सॅमसंग मार्गदर्शकांशी कनेक्ट होण्याची सुविधा मिळते.
''गॅलॅक्सी एम्पॉवर्डच्या माध्यमातून आम्ही शिक्षकांना त्यांच्या पाठांमध्ये एआय व तंत्रज्ञानाचा समावेश करण्यास, विद्यार्थी सहभाग वाढवण्यास आणि भविष्यासाठी सुसज्ज वर्ग निर्माण करण्यास मदत करत आहोत. हे फक्त प्रशिक्षण नाही तर चळवळ आहे,'' असे सॅमसंग इंडियाच्या एमएक्स बिझनेसचे उपाध्यक्ष आदित्य बब्बर म्हणाले.
''आपल्या शिक्षकांना सक्षम करणे वर्गांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना भविष्याकरिता सुसज्ज करण्यासाठी महत्त्वाचे आहे. सॅमसंगचा 'गॅलॅक्सी एम्पॉवर्ड' उपक्रम अगदी योग्य वेळी सादर करण्यात आलेला प्रयत्न आहे, जो सर्वसमावेशक, समान व दर्जेदार शिक्षणाप्रती भारताच्या कटिबद्धतेला साह्य करतो, तसेच एज्युकेशन २०३० अंतर्गत युनेस्कोच्या एसडीजी४ जागतिक ध्येयांशी संलग्न आहे. १.५ दशलक्ष शाळा, ४२,००० कॉलेज, जवळपस ११०० युनिव्हर्सिटी आणि १० दशलक्ष शिक्षकांसह भारत लोकशाही जगातील सर्वात मोठी शैक्षणिक परिसंस्था आहे. एनईपी शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे धोरणात्मक परिवर्तन आहे. शिक्षकांना डिजिटल साधने, सहकारी अध्ययन समुदाय आणि भविष्यासाठी सुसज्ज प्रशिक्षणासह सक्षम करत हा उपक्रम एनईपीशी संलग्न आहे आणि स्थिर व दूरगामी शैक्षणिक यंत्रणा घडवण्यामध्ये भारताच्या नेतृत्वाला दृढ करतो. आम्ही सॅमसंगचे शिक्षक समुदायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणि शैक्षणिक परिवर्तनाच्या या महत्त्वपूर्ण प्रवासामध्ये योगदान देण्यासाठी कौतुक करतो,'' असे युनेस्को, पॅरिसमधील भारताचे राजदूत (अॅम्बेसेडर) व कायम प्रतिनिधी श्री. विशाल व्ही. शर्मा म्हणाले.
कोणताही अडथळा नाही, फक्त संधी
गॅलॅक्सी एम्पॉवर्ड शिक्षक व संस्थांसाठी मोफत उपक्रम आहे. प्रत्येक सहभागीला विशेष सॅमसंग ऑफर्स मिळतात, ज्यामध्ये स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स व ग्राहक इलेक्ट्रॉनिक्सवर स्पेशल किमतीचा समावेश आहे, तसेच विस्तारित वॉरंटी आणि मोफत विमा पर्याय आहेत.
''कामकाजाचे भविष्य आगामी वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बदलण्यास सज्ज आहे, ज्यामुळे शिक्षकांनी भविष्याकरिता सुसज्ज असणे आवश्यक आहे. एआय कन्टेन्ट विकास करण्यामध्ये, मूल्यांकन प्रक्रिया सुधारण्यामध्ये आणि वर्गामधील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यामध्ये धोरणात्मक सक्षमकर्ता म्हणून सेवा देऊ शकते. विशेषत: जनरेटिव्ह एआय सर्वोत्तम प्रॉम्प्ट्स, कन्टेन्ट निर्मिती आणि विशिष्ट अध्ययन गरजांसाठी मॅपिंग सोल्यूशन्सच्या माध्यमातून नवीन संधी देते. सॅमसंग गॅलॅक्सी एम्पॉवर्ड सारखे उपक्रम शिक्षकांना एआय साधने समजण्यास आणि त्यांचा कार्यक्षमपणे वापर करण्यास मदत करत आहे. सीबीएसईमध्ये आम्ही विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच तार्किक आणि सर्जनशील क्षमता निर्माण करण्यासाठी इयत्ता तिसरीपासून संगणकीय विचारसरणीचे ज्ञान देत आहोत. मी सॅमसंगचे शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी आणि प्रशिक्षणात एआय-चालित मूल्यांकनांचा समावेश करण्यासाठी कौतुक करतो,'' असे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई)चे सचिव श्री. हिमांशू गुप्ता म्हणाले.
चळवळीमध्ये सामील व्हा
संपूर्ण मुंबईमधील शिक्षकांना या उपक्रमाची आगामी वैयक्तिक सत्रे आणि डिजिटल प्रशिक्षण सिरीजमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
For registration and more information, visit:
https://www.samsungindiamarketing.com/GalaxyEmpowered/SuperEducators.aspx
Comments
Post a Comment