०१रू मध्ये गणेशमुर्ती उपक्रम विघ्नहर्ता- बुध्दीदाता अमुल्य असल्याचे प्रतिक..!मुर्तीमय देवत्वा’पेक्षा ‘मुर्तीसाक्ष विवेकाची समाजाला गरज’.. - काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी
०१रू मध्ये गणेशमुर्ती उपक्रम विघ्नहर्ता- बुध्दीदाता अमुल्य असल्याचे प्रतिक..!
मुर्तीमय देवत्वा’पेक्षा ‘मुर्तीसाक्ष विवेकाची समाजाला गरज’..
- काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी
पुणे दि २७ ऑगस्ट -
श्री गणेश देवता’ ही विघ्नहर्त्या, बुध्दीदात्याचे अमुल्य प्रतिक असून, श्री गणेश-मुर्तीचे मुल्य करता येत नसल्याचे या उपक्रमातून स्पष्ट होते.
मुर्तीमय देवत्वा’पेक्षा ही ‘मुर्तीसाक्ष आत्म व नैतिक विवेकाची समाजाला खरी गरज’ असल्याचे प्रतिपादन काँग्रेस नेते व वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
नवी पेठेतील युवक काँग्रेस पदाधिकारी ‘कुणाल काळे मित्रपरीवार’ वतीने मात्र “०१रू देऊन गणेश मुर्तींचे वितरण” करण्याचा उपक्रम प्रसंगी गोपाळदादा तिवारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, आपल्या देवा - धर्मा विषयीची आत्मियता, विश्वास व श्रध्दा जोपासतांना ईतर धर्मा विषयीचा दुस्वास नसला पाहीजे. देशाच्या स्वातंत्र्या करीता लोकमान्य टीळक, भाऊ रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात स्वातंत्र्य प्रेमी नागरीकांचे संघटन, प्रबोधन व चळवळ ऊभी रहाण्यासाठी केले व त्यातुन प्रेरणा घेऊन विविध धर्मिय राष्ट्रीय नेते पुढे आले, स्वातंत्र्या करीता योगदान, बलीदान व जीवन समर्पित केले ही प्रजासत्ताक भारताची वास्तवता दुर्लक्षीत करता येणार नसल्याचे ही त्यांनी सागीतले.
संयोजक व शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष कुणाल सुरेश काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ३ वर्षा पासून चाललेल्या या उपक्रमा द्वारे सु ४५० कुटुंबीयांनी श्री गणेश मुर्ती नेल्याचे सांगीतले. या उपक्रमास काँग्रेस नेते मोहन दादा जोशी, गोपाळदादा तिवारी, राकाँ (शरद पवार) डॉ मदन कोठुळे, अनंत घरत, इंटक अध्यक्ष चेतन आगरवाल, युकाँ अध्यक्ष सौरभ अमराळे, हेमंत राजभोज, सागर धाडवे, अक्षय माने, सोनिया ओव्हल, प्रवीण करपे, गोरख पळसकर, राजू नाणेकर, निलेश वैराट, मोहन शेडगे सर इ नी भेटी दिल्या. या प्रसंगी सुरेश काका काळे, सुनिल विधाते, राजू पोटे, सुपेकर बंधू, थोपटे इ उपस्थित होते.
Comments
Post a Comment