‘आ लौट के आजा मेरे मित, तुझे मेरे गीत बुलाते है’पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित कार्यक्रमात मुकेश यांना स्वरआदरांजली
पुणे : ‘जो तुमको वा पसंद वही बात करेंगे’, ‘सावन का महिना पवन करे सोर’, ‘कही दूर जब दिन ढल जाए’, ‘सजन रे झूठ मत बोलो’, ‘दिल की नजरसे, नजरोंके दिले से’ अशा एकाहून एक सरस आणि सुमधुर गीतांनी पुणेकर रसिकांची सायंकाळ सूरांच्या वर्षावात न्हाऊन निघाली. निमित्त होते भावपूर्ण आणि मखमली आवाजाचे गायक मुकेश यांच्या पुण्यातिथीनिमित्त आयोजित स्वरआदरांजलीचे.
पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे ‘ये मौसम... रंगीन समा’ या विशेष सांगितीक कार्यक्रमाचे पूना गेस्ट हाऊस, लक्ष्मी रोड येथे आयोजन करण्यात आले होते.
सुप्रसिद्ध गायक लोकेश घांग्रेकर यांच्या एल. जी. बॅनर्सच्या अंतर्गत कार्यक्रम सादर झाला. सुप्रसिद्ध गायिका प्रीती पेठकर यांचा कार्यक्रमात सहभाग होता तर मॉम इंटरनॅशनलचे ज्येष्ठ गायक मोहनकुमार भंडारी यांनीही मुकेश यांची निवडक गाणी सादर करून रसिकांची वाहवा मिळविली.
‘बिखरा के जुल्फे चमन मे न जाना’, ‘किसी की मुस्कुराहटोंपे हो निसार‘, ‘ये मोसम… रंगीन समा’ ‘पुछों दिवानोंपे क्या गुजरी है’, ‘आ लौट के आजा मेरे मित, तुझे मेरे गीत बुलाते है’, ‘क्या खुब लगती हो, बडी सुंदर दिखती हो’, ‘ओ मेरे सनम’ अशा भावनांच्या विविध छटा दर्शविणारी गीते रसिकांना विशेष भावली.
जगप्रसिद्ध अभिनेते राजकपूर यांचा आवाज अशी ओळख असलेल्या मुकेश यांनी गायलेली अनेक चित्रपट गीते आजही रसिकांच्या स्मरणात राहिलेली आहेत. मुकेश यांच्या गायकीचे चाहते असलेल्या रसिकांनी कार्यक्रमाला टाळ्यांच्या गजरात भरभरून प्रतिसाद देत अनेक गाण्यांना वन्समोअरही दिला.
ॲड. प्रमोद आडकर, प्रदीप निफाडकर, डॉ. प्रसाद पिंपळखरे, पपिशकुमार ललगुणकर, अधिश पायगुडे, विजय कदम, आरजे बंड्या उपस्थित होते.
रत्ना दहिवेलकर यांनी आपल्या रसाळ वाणीत कार्यक्रमाचे निवेदन करून कार्यक्रमाला शोभा आणली. कलाकरांचा सत्कार डॉ. सतीश देसाई, सुशील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन पूना गेस्ट हाऊसचे संचालक अभय सरपोतदार, किशोर सरपोतदार यांनी केले. अजित कुमठेकर यांनी संयोजन केले.
Comments
Post a Comment