दोन्ही पायातील गुडघेदुखीने ग्रस्त असलेल्या 67 वर्षीय पुरूष रूग्णावर वेलीस रोबोटिक असिस्टेड सोल्युशन वापरून युनि कंपार्टमेंटल आर्थ्रोप्लास्टी प्रक्रिया यशस्वी * लोकमान्य हॉस्पिटलमधील डॉक्टर व आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या टीमने संपूर्ण गुडघारोपण टाळत फक्त आतल्या कप्प्यासाठी केली प्रक्रिया


दोन्ही पायातील गुडघेदुखीने ग्रस्त असलेल्या 67 वर्षीय पुरूष रूग्णावर वेलीस रोबोटिक असिस्टेड सोल्युशन वापरून युनि कंपार्टमेंटल आर्थ्रोप्लास्टी प्रक्रिया यशस्वी  

* लोकमान्य हॉस्पिटलमधील डॉक्टर व आंतरराष्ट्रीय तज्ञांच्या टीमने संपूर्ण गुडघारोपण टाळत फक्त आतल्या कप्प्यासाठी केली प्रक्रिया

पुणे,26 ऑगस्ट 2025 : लोकमान्य हॉस्पिटल्समधील डॉक्टरांच्या टीमने दोन्ही पायातील गुडघेदुखीने ग्रस्त असलेल्या 67 वर्षीय पुरूष रूग्णावर वेलीस रोबोटिक असिस्टेड सोल्युशन वापरून युनि कंपार्टमेंटल आर्थ्रोप्लास्टी प्रक्रिया यशस्वीरित्या केली आहे. प्रसिध्द आर्थोपेडिक सर्जन डॉ.नरेंद्र वैद्य,डॉ.सतीश काळे,डॉ.राकेश पाटील यांच्या नेतृत्वात आणि टेक्सास येथील प्रसिध्द आर्थोपेडिक सर्जन डॉ.उगो एन.लेकवेझू यांच्या उपस्थितीत ही शस्त्रक्रिया पार पडली.
 
या प्रक्रियेबाबत माहिती देताना लोकमान्य हॉस्पिटल्सचे अध्यक्ष आणि मुख्य रोबोटिक सर्जन डॉ.नरेंद्र वैद्य म्हणाले की, हा रूग्ण गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही गुडघ्यांच्या वेदनांनी त्रस्त होता. तपासणी केल्यावर असे दिसून आले की, त्याला चौथ्या टप्प्यातील संधिवात आहे आणि तो फक्त गुडघ्याच्या आतील (मध्यम) भागात आहे. सांध्याच्या ज्या भागाचे नुकसान झाले आहे,फक्त तो भाग बदलणे हा अधिक योग्य पर्याय असून अशा परिस्थितीत संपूर्ण गुडघा बदलणे टाळणे शक्य आहे.साधारणत: आपल्या गुडघ्यामध्ये तीन कप्पे असतात.ते सर्व बदलण्यापेक्षा कृत्रिम रोपणाने फक्त नुकसान झालेला भाग बदलणे योग्य ठरते.अशा प्रकारच्या प्रक्रियेत (रिसरफेसिंग सर्जरी) फक्त झीज झालेले कुर्चे बदलले जातात आणि कुठलेही अस्थिबंध कापले जात नाहीत.या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करत हाडांच्या अगदी काही मिलीमीटर म्हणजे नगण्य भाग या प्रक्रियेमध्ये समाविष्ट असतो.

मात्र हे सगळं करत असताना पार्शल नी रिप्लेसमेंटच्या बाबतीत पारंपारिक पध्दतीमध्ये अचूकता साधणे हे आव्हानात्मक असते,असे डॉ.वैद्य म्हणाले.जागतिक स्तरावर उपलब्ध असलेल्या वैद्यकीय साहित्यानुसार याचा अचूकतेचा दर 70 टक्के आहे.याचा अर्थ उर्वरित लोकांमध्ये अचूक संरेखन न साध्य होण्याची शक्यता असते आणि त्यांना सतत वेदना किंवा रोपण खराब होण्याची शक्यता असते.हे टाळण्यासाठी आता चौथ्या पिढीचे वेलीस रोबोट हे अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असून सीटी स्कॅन किंवा एमआरआय न करता गुडघ्याचा प्रभावी भाग बदलणे शक्य आहे.हे रूग्णांसाठी अतिशय उपयुक्त आहे,याचे कारण चारही अस्थिबंधांना ईजा न पोहचवत व गुडघ्याची सामान्य संरचना टिकवून ठेवत रूग्णाला पूर्ण हालचाल करता येते.

डॉ.वैद्य म्हणाले की, प्रत्येक गुडघ्यावर या प्रक्रियेला वीस मिनिटे लागली आणि दोन्ही गुडघ्यांच्या सांध्यामध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून फक्त आतील भाग बदलण्यात आले. दुसऱ्या दिवशी रूग्णाला लगेच चालायला लावण्यात आले आणि दोन दिवसांत तो घरी जाऊ शकला.

जागतिक आकडेवारीनुसार या तंत्रज्ञानामुळे रोपण टिकण्याचा दर हा 96 टक्के असून, 20 वर्षांनंतरही सांधे चांगले काम करू शकतात.या रोपणाची अचूकता ही पार्शल नी रिप्लेसमेंटच्या यशामध्ये सर्वांत महत्त्वाचा भाग आहे आणि या तंत्रज्ञानाच्या मदतीने शल्यचिकित्सक तीनही कप्प्यात अचूकतेने रोपण करू शकतात. हे पारंपरिक गुडघा रोपण प्रक्रियेमध्ये कठिण जाते.

डॉ.वैद्य म्हणाले की,ज्या रूग्णांना एकाच कप्प्यात संधिवाताचा त्रास आहे,त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान म्हणजे नवीन आशा असून सर्व हाडे व अस्थिबंधांना ईजा होत नाही.सर्व वयोगटातील रूग्णांसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त आहे,कारण यात जोखीम खूप कमी आहे,रोपण टिकण्याचा दर चांगला आहे,संसर्गाचा धोका कमी आहे आणि डीप व्हेन थ्रॉम्बोसिस आणि इतर गुंतागुंतींची जोखीम कमी आहे.आम्ही हे तंत्रज्ञान गेली चार वर्षे वापरत असून याचे अतिशय चांगले परिणाम दिसून आले आहेत.

वेलीस रोबोटिक तंत्रज्ञानाची जमेची बाजू ही आहे की, ही संपूर्णपणे रिअल टाईम प्रणाली आहे.यात सीटी स्कॅन किंवा एमआरआयची गरज नसल्याने इतर पध्दतींसारखे अतिरिक्त क्ष-किरण (रेडिएशन) टाळता येते.हे तंत्रज्ञान तुलनेने किफायतशीर असून प्रक्रियेपूर्वी योजनेवर अवलंबून नसून त्यामुळे अचूकता साधता येते.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :