"म" मराठीच्या जयघोषाने 11 गणेश मंडळाचे संयुक्त मिरवणूक : मराठी भाषेचा गौरव रथाने गणेश भक्तांना केले आकर्षण: मान्यवरांच्या हस्ते 500 मराठी शिक्षकांचा सन्मान : 10 हजार पुस्तकांचे वाटप



"म" मराठीच्या जयघोषाने 11 गणेश मंडळाचे संयुक्त मिरवणूक 

: मराठी भाषेचा गौरव रथाने गणेश भक्तांना केले आकर्षण
: मान्यवरांच्या हस्ते 500 मराठी शिक्षकांचा सन्मान 
: 10 हजार पुस्तकांचे वाटप

पुणे, २७ ऑगस्ट: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे या यावर्षी "म" मराठीचा या जयघोषाने धनकवडी येथील ११ गणेश मंडळांची संयुक्त रूपाने निघालेल्या मिरवणुकीने उपस्थित हजारो गणेश भक्तांना आकर्षित केले.
 बुद्धीच्या देवतेला पुस्तकांचा नैवेद्य अर्पण करून भाषेच्या गौरव रथावर धनकवडी येथील 11 मंडळाचे गणपती विराजमान झाले होते. या एकत्रित सार्वजनिक मिरवणूकीत धनकवडी येथील साईनाथ मित्र मंडळ, श्री शिव छत्रपती मित्र मंडळ, आदर्श मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ, केशव मित्र मंडळ, जय महाराष्ट्र मंडळ, अखिल नरवीर तानाजी नगर मित्र मंडळ , एकता मित्र मंडळ, विद्यानगरी मित्र मंडळ, रामकृष्ण मित्र मंडळ, आणि अखिल मोहन नगर मित्र मंडळ सहभागी झाले होते.
ही मिरवणूक गुलाबनगर, धनकवडी येथून सुरू होऊन धनकवडी गाव, केशव कॉम्प्लेक्स, विद्यानगरी शिवशंकर चौक ते मोहनगर येथे काढण्यात आली.
ज्ञान प्रबोधनीचा एक सुर, एक तालात वाजवण्यात आलेल्या ढोल पथकाने गणेश भक्तांना आकर्षित केले.
मिरवणुकी दरम्यान 500 मराठी भाषा शिक्षकांचा सन्मान करण्यात आलं. तसेच मिरवणूक मार्गावर 10 हजार मराठी पुस्तकांचे वितरण करण्यात आले .

यावेळी आमदार भीमराव तापकीर, वर्षा तापकीर, माजी नगरसेवक विशाल तांबे, मोहिनी देवकर, धनकवडी येथील सहाय्यक आयुक्त सुरेखा बनगे, आणि इटली वरून आलेल्या ऍन मॅडम यांची विशेष उपस्थिती होती.
 तसेच मंडळाचे अध्यक्ष संतोष धनवकडे, अभिषेक तापकीर, उदय जगताप, विजय क्षिरसागर, सुनिल पिसाळ व विश्वस्त अनिरूद्ध येवले, प्रतीक कुंभार, उदय गुंड पाटील, विकी सुबागडे, आनंद शिंदे, विशाल निगडे, उदय भोसले, सोमनाथ शिर्के, शंतनू येवले, मनोज शिंदे, विजय क्षीरसागर व अन्य मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :