दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) च्या मुख्य कार्यालयाचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

*दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) च्या मुख्य कार्यालयाचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन*
— *डिक्कीच्या पुढाकाराने दलित समाजात फार मोठी औद्योगिक क्रांतीची सुरुवात*— -*चंद्रकांत पाटील*
पुणे दि —- दलीत इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) च्या पुढाकाराने आणि त्यांच्या अथक प्रयत्नाने दलित समाजात उद्योग व्यवसायाचे महत्त्व वाढत आहे त्यामुळे दलित समाजात औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाल्याचे मत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला .ते दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री च्या मुक्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते .
        दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री (डिक्की) ची स्थापना पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या पुढाकाराने 14 एप्रिल 2005 रोजी करण्यात आली . डिक्कीचे देशभरात आणि परदेशातही 32 पेक्षा जास्त चॅपटर आहेत.तसेच 12000 हजाराहून अधिक सक्रिय सभासद आहेत .देशात विविध ठिकाणी कार्यालये आहेत .आज पुण्यात डिक्की च्या मुख्यालयाचे उद्घाटन समारंभ पार पडला.
          यावेळी पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी डिक्की चा प्रवास आणि भविष्यातील संकल्प सांगितला.त्यांच्या हस्ते उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना सन्मानित करण्यात आले .
           यावेळी डिक्की संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे ,राष्ट्रीय अध्यक्ष रवीकुमार नारा,डिक्की चे राष्ट्रीय शिपिंग अध्यक्ष राजेंद्र साळवे,गोपाल वासनिक अध्यक्ष महाराष्ट्र,राष्ट्रीय महिला समन्वयक सीमा कांबळे,पुणे अध्यक्ष ललित बनसोड ,नेक्स्ट जन च्या मैत्रेय कांबळे,संतोष कांबळे,निवेदिता कांबळे तसेच डिक्की चे राष्ट्रीय आणि राज्याचे प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी