रायसोनी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, वाघोलीतर्फे आव्हाळवाडी येथे एनएसएस शिबिराच्या माध्यमातून सामाजिक सेवा
पुणे - जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, वाघोली यांच्यातर्फे आव्हाळवाडी येथे नुकतेच ७ दिवसांचे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सेवा भावना, नेतृत्व आणि समुदायाशी संवाद निर्माण करणे हा होता. शिबिरादरम्यान, विद्यार्थ्यी स्वयंसेवकांनी ग्राम स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, जनजागृती मोहिम, मतदार नोंदणी, युवकांचे राष्ट्राप्रती समर्पण, महिला सबलीकरण, महिला स्वसंरक्षण यांसारख्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
शिबिराचे उद्घाटन आव्हाळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच श्री. नितीन घोलप, जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, वाघोलीचे संचालक डॉ. एच. आर. कुलकर्णी, उपसंचालक डॉ. प्रवीण जांगडे यांच्या हस्ते झाले.
उद्घाटन प्रसंगी बोलताना सरपंच नितीन घोलप यांनी सामाजिक सेवेचे महत्त्व आणि राष्ट्रनिर्माणात तरुणांच्या सहभागावर भर दिला. शिबिरात पर्यावरणीय शाश्वतता, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण यांसारख्या विषयांवर कार्यशाळा आणि परिसंवादाचे सत्र आयोजन करण्यात आले, ज्यामुळे सहभागी विद्यार्थ्यी आणि ग्रामस्थांच्या ज्ञानात आणि कौशल्यात भर पडली. शिबिरादरम्यान विद्यार्थी स्वयंसेवकांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर व्यवहार्य उपाय शोधण्याचा प्रयत्न केला.
महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. अभय कंद आणि सदस्य प्रा. विशाल वाघोले, प्रा. दिव्या गिरासे आणि प्रा. अक्षता डफळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी स्वयंसेवकांनी सामाजिक कल्याणासाठी सतत योगदान देण्याची आणि “नाही मी, तर तू” या एनएसएस ब्रीदवाक्याला पुढे नेण्याची शपथ घेऊन झाला.
रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. सुनील रायसोनी आणि रायसोनी एज्युकेशनचे कार्यकारी संचालक श्री. श्रेयस रायसोनी यांनी विद्यार्थ्यांचे आणि राष्ट्रीय सेवा योजना टीम अभिनंदन केले.
----
Comments
Post a Comment