अभिनवमध्ये भव्य 'डिजिटल डिटॉक्स कार्निवल'*चे आयोजन* : *विद्यार्थ्यांनी लुटला पत्रलेखन, कॅलिग्राफी,वारली पेंटिंग चा आनंद

*अभिनवमध्ये भव्य 'डिजिटल डिटॉक्स कार्निवल'*चे आयोजन* : 
*विद्यार्थ्यांनी लुटला पत्रलेखन, कॅलिग्राफी,वारली पेंटिंग चा आनंद*
 
*पुण्यात पहिल्यांदाच एखाद्या शाळेमध्ये अशा विविध प्रकारच्या कार्यशाळेचे एकाच वेळी आयोजन*

आंबेगाव येथील अभिनवच्या शैक्षणिक संकुलामध्ये 
आनंदाने, सर्जनशीलतेने भरलेल्या विविध प्रकारच्या कार्यशाळेचे एकाच वेळी आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये पत्रलेखन, कॅलिग्राफी,
वारली पेंटिंग, कलरिंग 
टॅटू ,मेहंदी , संगीत : (कराओके गायन, तबला आणि पियानो वादन, नृत्य कार्यशाळा),पूर्व प्राथमिक विभागाच्या वतीने 'समुदाय मदतनीस दिन,' शाळेतील महिला पालकांसाठी 'हळदी कुंकू' त्याचबरोबर शाळेतील विद्यार्थ्यांच्या घरातील ई-कचरा एकत्र करण्यात आला ,त्याच बरोबर माइंड गेम, वैज्ञानिक आणि सामाजिक शास्त्राचे उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले. या सर्व कार्यशाळांचा विद्यार्थी व पालकांनी मनमुराद आनंद घेतला.
     कार्यक्रमाची सुरुवात आंबेगाव पोस्ट ऑफिसच्या पोस्टमास्तर सुवर्णा भांडवलकर यांच्या हस्ते आणि झाकीर मुलाणी आणि सुनील जगताप या पोस्टमन काकांच्या उपस्थितीत करण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांना पोस्ट कार्ड देऊन त्यांना लिहायला सांगून ती पोस्ट कार्ड्स विद्यार्थ्यांनीच बनवलेल्या पोस्ट पेटीमध्ये टाकण्यात आली. सोशल मीडियाच्या आहारी गेलेल्या आधुनिक विद्यार्थ्यांना पत्रलेखन कला काय असते? हे समजावे हा या उपक्रमाच्या मागचा उद्देश होता.या उपक्रमाला पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला. यावेळी संस्थापक राजीव जगताप, सेक्रेटरी सुनीता जगताप, सह सेक्रेटरी निर्मोही जगताप, समन्वयक डॉ. सविता शिंदे प्राचार्या वर्षा शर्मा, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मनीषा शिंदे उपस्थित होत्या. हा उपक्रम सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या आणि चतुर्थशश्रेणी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या राबवण्यात आला.
*फोटो ओळ: आंबेगाव येथील अभिनवच्या शैक्षणिक संकुलामध्ये पोस्ट मास्तर सुवर्णा भांडवलकर यांनी पत्रलेखना विषयी मार्गदर्शन केले*.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा