आरकेजी स्नुकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा-पुणे विभागाची पात्रता फेरी !! तहा खान, फैझल खान, दिग्विजय कडीयान, मयुर गर्ग उपांत्य फेरीत !!
पुणे, २२ डिसेंबरः देवभुमी बिलीयर्ड आणि स्नुकर असोसिएशन, दिल्ली बिलीयर्डस् आणि स्नुकर असोसिएशन आणि पुणे जिल्हा बिलीयर्ड आणि स्नुकर संघटेनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या आरकेजी स्नुकर अजिंक्यपद १०-रेड स्नुकर स्पर्धेची पुणे पात्रता फेरीत पुण्याचा तहा खान, मुंबईचा फैझल खान आणि दिग्विजय कडीयान, मयुर गर्ग यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरी गाठली आहे.
वडगांवशेरी येथील द क्यु क्लब सुरू असलेल्या या स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू फैझल खान याने पुण्याच्या सुरज राठी याचा ११-३४, ३९-२१, २१-४५, ४३-२७, ४५-३८, ५२-३६ असा पराभव केला. सामन्यामध्ये २-२ अशा बरोबरीनंतर फैझल याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करून ४५-३८, ५२-३६ अशा फ्रेम जिंकून ४-२ असा सामना जिंकला. पुण्याच्या तहा खान याने दर्शन जी. याचा ४-२ असा पराभव केला. मयुर गर्ग याने विजय नचानी याचा १८-३९, ४३-२८, २२-४६, ५०-१०, ४१-२१, ३९-१८ असा पराभव करून आगेकूच केली.
दिग्विजय कडीयान याने पुण्याच्या अभिजीत रानाडे याचा ४-२ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. या सामन्यामध्ये अभिजीत याने चांगली सुरूवात करताना ३८-११ अशी फ्रेम जिंकली. दिग्विजय याने २९-१२ अशी दुसरी फ्रेम जिंकली. तिसरी फ्रेमसुद्धा दिग्विजय याने ३३-२१ अशी जिंकत २-१ अशी आघाडी घेतली. अभिजीत याने चौथी फ्रेम ३९-१८ अशी जिंकली आणि सामन्यामध्ये २-२ अशी बरोबरी निर्माण केली. पाचवी आणि सहावी फ्रेममध्ये दिग्विजय याने सरस खेळ करून ४४-३६ आणि ४५-२९ अशा गुणफरकाने फ्रेमसह सामना जिंकला.
स्पर्धेचा निकालः तिसरी बाद फेरीः
अभिजीत रानाडे वि.वि. साद सय्यद ३-१ (३३-१२, १२-४३, ४३-२२, ३९-२५);
तहा खान वि.वि. सोनु मातंग ३-२ (३४-२१, ११-३८, ४४-२८, २१-४५, ४६-३२);
दिग्विजय कडीयान वि.वि. रोहीत रावत ३-१ (३७-१८, ११-३९, ४५-२९, ४२-३१);
दर्शन जी. वि.वि. कैवल्य जाधव ३-१ (२१-४४, ४५-२८, ४३-२७, ३९-१३);
उपांत्यपुर्व फेरीः
फैझल खान वि.वि. सुरज राठी ४-२ (११-३४, ३९-२१, २१-४५, ४३-२७, ४५-३८, ५२-३६);
तहा खान वि.वि. दर्शन जी. ४-२ (४५-१३, २१-५१, ४४-२८, १९-३९, ३८-२८, ४२-२७);
दिग्विजय कडीयान वि.वि. अभिजीत रानाडे ४-२ (११-३८, २९-१२, ३३-२१, १८-३९, ४४-३६, ४५-२९);
मयुर गर्ग वि.वि. विजय नचानी ४-२ (१८-३९, ४३-२८, २२-४६, ५०-१०, ४१-२१, ३९-१८).
Comments
Post a Comment