आरकेजी स्नुकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा-पुणे विभागाची पात्रता फेरी !! कैवल्य जाधव, फैझल खान, सोनु मातंग, नरेश अहीर तिसर्‍या फेरीत !!

पुणे, २१ डिसेंबरः देवभुमी बिलीयर्ड आणि स्नुकर असोसिएशन, दिल्ली बिलीयर्डस् आणि स्नुकर असोसिएशन आणि पुणे जिल्हा बिलीयर्ड आणि स्नुकर संघटेनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहाव्या आरकेजी स्नुकर अजिंक्यपद १०-रेड स्नुकर स्पर्धेची पुणे पात्रता फेरीत कैवल्य जाधव, फैझल खान, सोनु मातंग, नरेश अहीर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.

वडगांवशेरी येथील द क्यु क्लब सुरू असलेल्या या स्पर्धेत चुरशीच्या झालेल्या सामन्यामध्ये चुरशीच्या झालेल्या सामन्यामध्ये कैवल्य जाधव याने लक्ष्मण रावत याचा ३२-१२, १४-३९, ४४-२९, १५-४२, ४३-२८ असा संघर्षपूर्ण पराभव केला. पहिल्या फ्रेममध्ये कैवल्य याने ३२-१२ अशी जिंकली. दुसर्‍या फ्रेममध्ये लक्ष्मण याने ३९-१४ अशागुणांसह सामन्यामध्ये १-१ अशी बरोबरी निर्माण केली. तिसरी फ्रेम कैवल्य याने ४४-२९ अशी जिंकून २-१ अशी आघाडी घेतली. चौथी फ्रेम लक्ष्मणने ४२-१२ अशी जिं कली आणि सामन्यामधील आपले आव्हान कायम ठेवले. अंतिम आणि निर्णयक फ्रेममध्ये कैवल्य याने खेळ उंचावत ४३-२८ अशा गुणांसह सामना जिंकला. फैझल खान याने अमरदीप घोडके याचा २९-१८, ११-३८, ४५-२४, ४२-२८ असा पराभव केला.

सोनु मातंग याने अनुराग शर्मा याचा ४४-१८, ३९-२३, १३-४१, ४२-२९ असा पराभव करून आगेकूच केली. नरेश अहीर याने अजय कलानी याचा ३६-१८, १७-३९, ४४-२८, ४२-३१ असा पराभव केला. सुरज राठी याने तन्मय जाटकर याचा ४३-१४, ३९-१५, ४०-१८ असा सहज पराभव केला.

स्पर्धेचा निकालः दुसरी बाद फेरीः
सुरज राठी वि.वि. तन्मय जाटकर ४३-१४, ३९-१५, ४०-१८;
महेश जगदाळे वि.वि. सिद्धांत फाटे ३४-१०-, ४४-२९, ३९-२१;
फैझल खान वि.वि. अमरदीप घोडके २९-१८, ११-३८, ४५-२४, ४२-२८;
सोनु मातंग वि.वि. अनुराग शर्मा ४४-१८, ३९-२३, १३-४१, ४२-२९;
दिग्विजय कडीयान वि.वि. मोहीत शर्मा ३९-२१, ४१-२८, ४५-२३;
कैवल्य जाधव वि.वि. लक्ष्मण रावत ३२-१२, १४-३९, ४४-२९, १५-४२, ४३-२८;
नरेश अहीर वि.वि. अजय कलानी ३६-१८, १७-३९, ४४-२८, ४२-३१.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय करणाऱ्या एअरटेल,वाकडेवाडी येथील शाहबाद अहमद ह्या टिम लीडर ला मनसे स्टाईल चोप :

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा