आरकेजी स्नुकर राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची पुणे विभागाची पात्रता फेरी स्पर्धा १७ डिसेंबर पासून !!
पुणे, ९ डिसेंबरः देवभुमी बिलीयर्ड आणि स्नुकर असोसिएशन आणि दिल्ली बिलीयर्डस् आणि स्नुकर असोसिएशन यांच्यावतीने सहाव्या आरकेजी स्नुकर अजिंक्यपद १०-रेड स्नुकर स्पर्धेसाठीची पुणे पात्रता फेरीचे १७ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक मनमीतसिंग भाटीया आणि भारतीय बिलीयर्डस् व स्नुकर फेडरेशनचे माजी उपाध्यक्ष राजन खिंवसरा म्हणाले की, या राष्ट्रीय स्पर्धेची पात्रता फेरी पुण्यामध्ये होणार असून पुण्यातील खेळाडूंसाठी ही मोठी संधी ठरणार आहे. देशातील एकूण सहा शहरांमध्ये या स्पर्धेची पात्रता फेरी खेळवण्यात येत असून चौथी पात्रता फेरी पुण्यात होणार आहे. प्रत्येक पात्रता फेरीतुन दोन खेळाडून मुख्य स्पर्धेसाठी प्रवेश करणार असून यानंतर स्पर्धेची मुख्य फेरी दिल्ली शहरात होणार आहे. या स्पर्धेत देशातील एकापेक्षा एक अव्वल आणि सरस खेळाडू सहभागी झाले आहेत. याआधी देहरादुन, अमृतसर आणि भोपाळ या ३ शहरांमध्ये या स्पर्धेची पात्रता फेरी खेळवण्यात आली आहे.
पुणे जिल्हा बिलीयर्ड आणि स्नुकर संघटेनेच्यावतीने पुण्यातील द क्यु क्लब येथे स्पर्धेची पात्रता फेरी होणार असून स्पर्धेत एकूण १२८ खेळाडू भाग घेणार आहेत. महाराष्ट्रातील गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांसह मुंबई, सातारा, कोल्हापुर, नाशिक, कर्हाड या शहरांमधील खेळाडू सहभागी होणार आहेत.
या संपूर्ण स्पर्धेची पारितोषिक रक्कम ११ लाख पंचवीर हजार रूपये असून संपूर्ण स्पर्धेचे प्रायोजक्त्व रविंद्र कुमार गुप्ता (आरकेजी) यांनी केले आहे. रविंद्र गुप्ता हे स्वतः उत्तम क्युपटू असून या स्पर्धेचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी गेली अनेक वर्षे काम करत आहेत. गुप्ता यांनी स्नुकर विषयींची पुस्तकेही प्रकाशीत केली आहेत तसेच त्यांनी अनेक भारतीय क्युपटूंना आर्थिक पाठींबा दिला आहे.
Comments
Post a Comment