आमदार माधुरी मिसाळ यांनी आज सकाळी साडेअकरा वाजता सिताराम आबाजी बिबवे शाळा, बिबवेवाडी येथे कुटुंबीयांसह मतदानाचा हक्क बजावला.



प्रतिक्रिया

गेली पंधरा वर्षे आमदार म्हणून पर्वती विधानसभा मतदारसंघाचा गतिमान, शाश्वत, नियोजनबद्ध विकास करु शकले. त्यामुळे जनतेचे भरभरून प्रेम आणि विश्वास संपादन करता आला. महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी एकसंघपणे एकदिलाने प्रचार केला. आम्ही केलेली विकासकामे आणि योजना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्या. त्याचे प्रत्यंतर आज झालेल्या मतदानात दिसून आले. पर्वतीतील मतदारांनी आज उत्स्फूर्तपणे मतदान केले. आज झालेले मतदान पाहता मी विक्रमी मताधिक्याने विजय होईल असा दृढ विश्वास आहे. मतदारांनी टाकलेला हा विश्वास मी सार्थ ठरवेल असे वचन देते. पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा