भारतरत्न सचिन तेंडूलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचे सदिच्छादूत / ब्रँड ॲम्बेसेडरचितळे बंधू मिठाईवाले यांचे ७५ व्या वर्षात पदार्पण

     
पुणे, दि. २६ ऑगस्ट : आपल्या अनेकविध मिठाई, नमकीन आणि एकाहून एक सरस स्नॅक्स पदार्थांसाठी भारतभर नावलौकिक असलेले चितळे बंधू मिठाईवाले यावर्षी आपल्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करत असताना 'क्रिकेटचा देव' अशी ओळख असलेले भारतरत्न सचिन तेंडुलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचे सदिच्छादूत / ब्रँड ॲम्बेसेडर असतील अशी घोषणा चितळे बंधू मिठाईवालेचे भागीदार केदार व इंद्रनील चितळे यांनी केली आहे. नजीकच्या भविष्यातील चितळे बंधू यांचा हा प्रवास सचिन तेंडुलकर यांच्या प्रमाणेच परंपरा व ‘स्टार पॉवर’ यांचा संगम असलेला व सचिनच्या चाहत्यांप्रमाणेच ग्राहकांनाही आनंद देणारा असेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

दूरदर्शी विचार असलेले स्व. भाऊसाहेब चितळे आणि त्यांच्या नंतर स्व. राजाभाऊ चितळे यांनी १९५० च्या सुमारास चितळे बंधू मिठाईवाले यांची स्थापना केली. या क्षेत्रात दोघांनी उत्कृष्टतेचे नवीन मापदंड प्रस्थापित केले. यामुळे चितळे बंधू हे नाव असंख्य घरांमधील अविभाज्य भाग बनले. गुणवत्ता, दर्जा आणि परंपरेविषयी असलेल्या बांधिलकीमुळे चितळे बंधू मिठाईवाले यांना देशातीलच नव्हे तर परदेशातील घराघरांत सर्वपरिचित नाव म्हणून ओळखले जाते. एका लहान आकाराच्या मिठाईच्या दुकानापासून सुरु झालेला हा प्रवास आज दर्जेदार व स्वादिष्ट उत्पादनांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘ब्रँड’पर्यंत विस्तारला आहे. इतकेच नव्हे तर चितळे बंधू हा ब्रँड आपल्या प्रीमियम व विस्तृत श्रेणी सोबतच सर्वसामान्यांना परवडतील अशा श्रेणीमध्ये मिठाई, नमकीन आणि स्नॅक डिलाइट्सची पॉकेट फ्रेंडली उत्पादने यांसाठी देखील ओळखला जातो हे विशेष.  

माधव चितळे, श्रीकृष्ण चितळे आणि संजय चितळे यांच्या नेतृत्वाखाली चितळे बंधू यांच्या दुसऱ्या पिढीने व्यावसायिकतेचा पाया रचला. त्यांनी रिटेल व वितरण व्यवस्थेला आणखी भक्कम करून व्यवसायाला खऱ्या अर्थाने बळ दिले आणि त्याचा विस्तार देखील केला. हे करत असताना सामाजिक बांधिलकी व शाश्वत दृष्टीकोन यांच्या बळावर त्यांनी प्रगती साधली. शिवाय त्यांच्या या सर्वसमावेशक प्रयत्नांमुळे चितळे बंधू हे नाव ग्राहकांच्या हृदयापर्यंत पोहोचले.

सचिन तेंडुलकर आता चितळे बंधू मिठाईवाले यांचे ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ झाल्याचे औचित्य साधत आम्ही आता क्रिकेटच्या या आयकॉनिक ब्रँडसोबत नमकीन व मधल्या भुकेच्या वेळेत खाता येण्यासारख्या (स्नॅक्स) पदार्थांची नवीन श्रेणी ग्राहकांसाठी सादर करणार आहोत. या नव्या श्रेणीतील पदार्थ ग्राहकांच्या आवडत्या चवींपासून प्रेरित झाले असून ते उत्कृष्टतेच्या कसोटीवर खरे उतरतील. चितळे बंधू मिठाईवाले आणि सचिन तेंडुलकर यांचे एकत्र येणे / जोडले जाणे ही केवळ व्यवासायिक भागीदारी नसून एकसारखी मूल्ये, वारसा आणि उत्कृष्टता या सर्व बाबींचा सुरेख संगम आहे, असे चितळे बंधू मिठाईवालेचे भागीदार केदार चितळे यांनी नमूद केले.

परंपरा आणि उत्कृष्टतेला कायमच जपत आलेल्या चितळे बंधू यांसारख्या ब्रँड सोबत भागीदारी करत असताना मला आनंद होत आहे असे सांगत सचिन तेंडुलकर म्हणाले, “चितळे बंधू मिठाईवाले हे पिढ्यानपिढ्या माझ्यासह अनेकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. आज ते आपल्या व्यवसायाचे महत्त्वपूर्ण असे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत असताना त्यांच्या या आनंदात सामील होण्यास मी देखील उत्सुक आहे. भविष्यातही ते जगभरातील कुटुंबांना आपल्या चवीच्या माध्यमातून आनंद देतील असा माझा विश्वास आहे.”

चितळे बंधू यांच्या संस्थापकांनी समर्पण आणि उत्कृष्टतेचे मूल्य जपत आजवर व्यवसाय केला आहे. सचिन तेंडुलकर देखील हीच मूल्ये जपत असल्याने ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून त्यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. या भागीदारीद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांसोबत नव्या आठवणी निर्माण करण्यास सज्ज असल्याचे चितळे बंधू मिठाईवालेचे भागीदार इंद्रनील चितळे यांनी सांगितले.

१९७६ मध्ये, चितळे बंधू यांनी बाकरवडी हा महाराष्ट्राचा पदार्थ सादर केला. अल्पावधीतच हा पदार्थ ग्राहकांच्या पसंतीस उतरला या पदार्थाची वाढती मागणी लक्षात घेता, चितळे बंधू यांनी १९९६ मध्ये बाकरवडीचे मशीन द्वारे उत्पादन करणारी भारतातील पहिली कंपनी म्हणून ओळख मिळविली. बाजारपेठेतील वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण गुणवत्ता व चव सुनिश्चित करण्याचे संस्थेचे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल होते असे म्हणता येईल. पुण्यातील गजबजलेल्या रस्त्यांपासून सुरु झालेला चितळे बंधू यांचा हा प्रवास आज युनायटेड स्टेट्स, युरोप, आखाती देश आणि त्यापलीकडे आज चितळे बंधू - अमेरिका इथवर पोहोचत घराघरांमध्ये सण उत्सवांचा एक अविभाज्य भाग बनला आहे. यामध्ये आज मिठाई ते चटपटीत पदार्थांपासून २५० हून अधिक उत्पादनांची वैविध्यपूर्ण श्रेणी यांचा समावेश आहे.

आज आपल्या गौरवशाली इतिहासाकडे मागे वळून पाहत असतानाही चितळे बंधू हे आपली चव आणि अनुभवसंपन्न उत्पादने यांची भविष्यवेधी मांडणी करण्यावर लक्ष केंद्रित करीत आहेत. सचिन तेंडुलकरसह आपल्या ७५ व्या वर्धापनदिनाची सुरुवात करीत असताना चितळे बंधू हे यशाच्या आपल्या नव्या अध्यायाला सुरुवात करीत असून हा अध्याय देखील परंपरा व आधुनिकतेचा मिलाफ असलेला आणि उत्तरोतर यशाची पायरी चढणारा असेल असा आम्हाला विश्वास आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र राज्यातील साखर कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज मंत्रालयामध्ये सहकार मंत्री मा नामदार दिलीप वळसे पाटील यांनी बैठक

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी