अभिनवच्या एन एस एस विभागातर्फे २६/११ मधील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली*
*अभिनवच्या एन एस एस विभागातर्फे २६/११ मधील शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली* आंबेगाव बु ||येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमधील एन एस एस विभागातर्फे २६/११ मध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर बांधवाना साश्रुनयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी एन एस एस च्या विद्यार्थ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून दहशतवाद्यांना कंठस्नान घालता घालता आपला जीव गमावणाऱ्या शहिदांना पुष्पांजली अर्पण करून भारतमातेच्या रक्षणासाठी सर्वार्थाने झटण्यासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा या एन एन एस स्वयंसेवकांनी केली. संस्थापक राजीव जगताप यांनी भारत मातेला समृद्ध करण्यासाठी आजच्या तरुणांनी 26 / 11 मध्ये शहीद झालेल्या जवानांचे बलिदान कधीच व्यर्थ जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले तर संविधान दिनानिमित्त संविधानाचे सर्व विद्यार्थ्यांनी वाचन करून ते जतन करण्यासाठी प्रत्येकाने कटिबध्द राहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रम अधिकारी विनोदकुमार बंगाळे आणि स्वाती काळे यांनी सर्व शिक्षकांच्...