Posts

पुणे जिल्हा हौशी मुष्टियुद्ध संघटना,पुणे .यांचे वतीने आज मंगळवार दिनांक 23 जून 2026 रोजी पंडित नेहरू स्टेडियम ,पुणे.येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा करण्यात आला.

Image
पुणे जिल्हा हौशी मुष्टियुद्ध संघटना,पुणे .यांचे वतीने आज मंगळवार दिनांक 23 जून 2026 रोजी पंडित नेहरू स्टेडियम ,पुणे.येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा करण्यात आला.  याप्रसंगी खेळाडूं,क्रीडाप्रेमी आणि संघटक यांच्यासाठी एक चर्चासत्र आयोजित केले होते या चर्चासत्रात राष्ट्रीय मुष्टियुद्ध पंच सुनील नेवरेकर यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन साजरा करण्यामागची भूमिका सांगितली. सर्व वयोगटातील लोकांना फिटनेस खेळ आणि शारीरिक हालचालीसाठी प्रोत्साहित करणे आणि उत्कृष्टता मैत्री आणि आदर या ऑलिम्पिक मूल्याचा प्रसार आणि प्रचार करणे यासाठी गठित झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अधिकृत स्थापना दिवस संयुक्त राष्ट्र संघाने 20 डिसेंबर 2002 रोजी मान्य केलेल्या ठरावानुसार 23 जून 2003 पासून अधिकृतरित्या साजरा केला. जाऊ लागला अशी माहिती श्री नेवरेकर यांनी दिली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पराग गानू हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती असफिया सय्यद यांनी केले याप्रसंगी कोकणस्थ परिवार ,पुणे ,क्रीडा महर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठान,क्रीडा कट्टा आदी संस्थांचे कार्यकर्ते आणि खेळाडू उपस्थित होते दिनेश पाड...

विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवनओपन हार्ट शस्त्रक्रियेला जीवनरक्षक पर्याय ‘टीएव्हीआर’

Image
विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ७५ वर्षीय रुग्णाला दिले नवजीवन ओपन हार्ट शस्त्रक्रियेला जीवनरक्षक पर्याय ‘टीएव्हीआर’  पुणे/लोणी काळभोर २३ जून ः रुग्णाला कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेने चीर, भूल किंवा छाती न उघडता रुग्णाच्या ह्दयाच्या झडपेचे कार्य ‘ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट’ (टीएव्हीआर) प्रक्रियाने पूर्ववत करून ७५ वर्षीय रुग्णाला नव जीवनदान देण्याचे कार्य लोणी काळभोर येथील माईर्सच्या विश्वराज हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी केले. विशेष म्हणजे सुमारे दीड तास चाललेल्या या प्रक्रियेदरम्यान रुग्ण पूर्णपणे शुद्धीत होता आणि वैद्यकीय टीमशी संवाद ही साधत होता. अशी माहिती विश्वराज हॉस्पिटलचे ह्दयरोग तज्ज्ञ डॉ. सूरज इंगोले यांनी पत्रकार परिषदेत दिली.  यावेळी विश्वराज हॉस्पिटलचे एमडी डॉ. सुजीथ कुमार आणि ऑपरेशन्स एचओडी डॉ. संतोष साहू उपस्थित होते.  डॉ. सूरज इंगोले यांनी सांगितले की, संबंधित रुग्ण ७५ वर्षीय पुरूष असून त्यांचा ह्दयविकाराचा वैद्यकीय इतिहास गुंतागुंतीचा होता. १५ वर्षापूर्वी त्यांची कोरोनरी आर्टरी बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर २ वर्षापूर्वी ह्दयविक...

शिष्यांची प्रगती पाहून मी कृतार्थ : प्रा. सुभाषचंद्र बोंडेशिष्य परिवारातर्फे प्रा. सुभाषचंद्र बोंडे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

Image
शिष्यांची प्रगती पाहून मी कृतार्थ : प्रा. सुभाषचंद्र बोंडे शिष्य परिवारातर्फे प्रा. सुभाषचंद्र बोंडे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान पुणे : मला आयुष्यात उत्तम गुरू, मार्गदर्शक लाभले, त्यातूनच माझे व्यक्तिमत्त्व फुलत गेले. वडिलांनी माझ्यावर आत्मविश्वास दाखविल्याने मी खऱ्या अर्थाने घडलो. आपल्या हातून पुढची पिढी घडावी या निरपेक्ष भावनेने मी कार्यरत राहिलो. मी दिलेल्या शिक्षणाचा पुरेपूर उपयोग करून शिष्य पुढे गेले याचे समाधान लाभल्याने मी आज कृतार्थ आहे. शिष्यांनी केलेली प्रगती पाहून मला गुरू म्हणून भरभरून आनंद मिळतो आहे. ‘गुरू से चेला सवाई’ ही उक्ती माझ्याबाबतीत खरी ठरली आहे, अशा भावना ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. सुभाषचंद्र बोंडे यांनी व्यक्त केल्या. स्थापत्य अभियांत्रिकी शैक्षणिक व सल्ला सेवा क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल प्रा. सुभाषचंद्र बोंडे त्यांचा त्यांच्या शिष्य परिवारातर्फे सोमवारी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्या वेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ आणि मानपत्र...

एकात्मिक किनारी सुरक्षा कायदा लागू करण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी

Image
एकात्मिक किनारी सुरक्षा कायदा लागू करण्याची नागरिक सोशल फाउंडेशनची मागणी पुणे : २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील किनारी सुरक्षेबाबत विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्या तरी माहिती देवाणघेवाणीतील विलंब, विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव आणि किनारी भागातील अपुरी देखरेख या समस्या अद्याप कायम असल्याचा दावा करत नागरिक सोशल फाउंडेशनने केंद्र व राज्य सरकारकडे "युनिफाइड कोस्टल सिक्युरिटी ॲक्ट" (Unified Coastal Security Act) लागू करण्याची मागणी केली आहे. अशी माहिती न नागरिक सोशल फाउंडेशन चे अँड .रोहन कानिटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.  पत्रकार परिषदेला नागरिक सोशल फाउंडेशनचे विश्वस्त प्रीतम थोरवे, ॲड .सर्वेश मेहेंदळे आदि मान्यवर उपस्थित होते.  पुढे बोलताना ॲड . रोहन कानिटकर यांनी सांगितले की, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात १६६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही किनारी सुरक्षेतील धोके कायम आहेत. दुसरीकडे, विकसित होत असलेल्या वधावन बंदर प्रकल्पामुळे महाराष्ट्राचे सामरिक आणि आर्थिक महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. वढवन बंदर कार्यान्वित झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय मालव...

समरसता लोककला संमेलन २०२६ चे २८ जून रोजी पुण्यात आयोजन

Image
समरसता लोककला संमेलन २०२६ चे २८ जून रोजी पुण्यात आयोजन संमेलनाच्या अध्यक्षपदी पद्मश्री रघुवीर खेडेकर यांची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; लोककला, साहित्य आणि संस्कृतीचा अनोखा संगम पुणे : लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारसा जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य समरसता साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘समरसता लोककला संमेलन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या संमेलनाच्या अध्यक्षपदी लोककलावंत पद्मश्री रघुवीर खेडेकर यांची निवड  करण्यात आली असून हे संमेलन २८ जून २०२६ रोजी होणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.  यावेळी धनंजय खुडे, विलास लांडगे, विजय मोरे, सुनील खंडाळे, रेश्मा मुसळे-परीतेकर, विकास माने, बाळासाहेब मालुसकर, जितेंद्र वाईकर,  उपस्थित होते.  समरसता लोककला संमेलन २०२६ चे  उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीध...

शिष्यांची प्रगती पाहून मी कृतार्थ : प्रा. सुभाषचंद्र बोंडेशिष्य परिवारातर्फे प्रा. सुभाषचंद्र बोंडे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

Image
शिष्यांची प्रगती पाहून मी कृतार्थ : प्रा. सुभाषचंद्र बोंडे शिष्य परिवारातर्फे प्रा. सुभाषचंद्र बोंडे यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान पुणे : मला आयुष्यात उत्तम गुरू, मार्गदर्शक लाभले, त्यातूनच माझे व्यक्तिमत्त्व फुलत गेले. वडिलांनी माझ्यावर आत्मविश्वास दाखविल्याने मी खऱ्या अर्थाने घडलो. आपल्या हातून पुढची पिढी घडावी या निरपेक्ष भावनेने मी कार्यरत राहिलो. मी दिलेल्या शिक्षणाचा पुरेपूर उपयोग करून शिष्य पुढे गेले याचे समाधान लाभल्याने मी आज कृतार्थ आहे. शिष्यांनी केलेली प्रगती पाहून मला गुरू म्हणून भरभरून आनंद मिळतो आहे. ‘गुरू से चेला सवाई’ ही उक्ती माझ्याबाबतीत खरी ठरली आहे, अशा भावना ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. सुभाषचंद्र बोंडे यांनी व्यक्त केल्या. स्थापत्य अभियांत्रिकी शैक्षणिक व सल्ला सेवा क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल प्रा. सुभाषचंद्र बोंडे त्यांचा त्यांच्या शिष्य परिवारातर्फे सोमवारी जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्या वेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते. अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ आणि मानपत्र...

धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजनधर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे आणि जनहित चॅरिटेबल ट्रस्ट : सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा भव्य संगमआरोग्य शिबिर, रक्तदान, ११ हजार वडापाव वाटप, गोसेवा, शैक्षणिक मदत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Image
धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे आणि जनहित चॅरिटेबल ट्रस्ट : सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा भव्य संगम आरोग्य शिबिर, रक्तदान, ११ हजार वडापाव वाटप, गोसेवा, शैक्षणिक मदत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पुणे : धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे आणि जनहित चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दिनांक २६ जून २०२६ रोजी सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर परिसर येथे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा भव्य संगम होणार आहे. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती पुणे चे अध्यक्ष पियुष विजय कुमार शहा, उपाध्यक्ष निलेश खाणेकर जनहित चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष प्रकाश ढमढेरे, उत्सव प्रमुख रोहन जाधव यांनी उपक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या विविध छटा उलगडणाऱ्या रंगावली प्रदर्शनाने होणार आहे. याचबरोबर महिला स्वच्छतादूत भगि...