धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजनधर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे आणि जनहित चॅरिटेबल ट्रस्ट : सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा भव्य संगमआरोग्य शिबिर, रक्तदान, ११ हजार वडापाव वाटप, गोसेवा, शैक्षणिक मदत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन


धर्मवीर संभाजी महाराज जयंतीनिमित्त समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे आणि जनहित चॅरिटेबल ट्रस्ट : सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा भव्य संगम
आरोग्य शिबिर, रक्तदान, ११ हजार वडापाव वाटप, गोसेवा, शैक्षणिक मदत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

पुणे : धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे आणि जनहित चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवार, दिनांक २६ जून २०२६ रोजी सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिर परिसर येथे सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचा भव्य संगम होणार आहे.

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती पुणे चे अध्यक्ष पियुष विजय कुमार शहा, उपाध्यक्ष निलेश खाणेकर जनहित चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष प्रकाश ढमढेरे, उत्सव प्रमुख रोहन जाधव यांनी उपक्रमाचे आयोजन केले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ वाजता धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या विविध छटा उलगडणाऱ्या रंगावली प्रदर्शनाने होणार आहे. याचबरोबर महिला स्वच्छतादूत भगिनींसाठी ब्रेस्ट कॅन्सर शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, तसेच ईसीजी, सीबीसी, मधुमेह, रक्तदाब, दंत तपासणी आदी विविध तपासण्यांसह आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्ताचा प्रत्येक थेंब अमूल्य असल्याचा संदेश देत भव्य रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले आहे.

दुपारी १२.३० वाजता गोशाळांना गोधनाच्या खाद्यस्वरूपात मदत करण्यात येणार असून, दुपारी ४ वाजता अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच ग्रामीण व आदिवासी-कातकरी विद्यार्थ्यांना शालेय क्रीडा साहित्याचे वितरणही करण्यात येणार आहे.

संभाजी महाराज जयंतीनिमित्त ११ हजार वडापाव वाटपाचा उपक्रमही राबविण्यात येणार असून, या उपक्रमाची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. सकाळी ९.१५ वाजता या उपक्रमास प्रारंभ होणार आहे.

सायंकाळी ५ ते ८ या वेळेत 'विश्व आख्यान' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, इतिहास, कला आणि संस्कृतीचा संगम घडविणाऱ्या या कार्यक्रमातून छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य आणि विचार मांडले जाणार आहेत

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश