पुणे जिल्हा हौशी मुष्टियुद्ध संघटना,पुणे .यांचे वतीने आज मंगळवार दिनांक 23 जून 2026 रोजी पंडित नेहरू स्टेडियम ,पुणे.येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा करण्यात आला.

पुणे जिल्हा हौशी मुष्टियुद्ध संघटना,पुणे .यांचे वतीने आज मंगळवार दिनांक 23 जून 2026 रोजी पंडित नेहरू स्टेडियम ,पुणे.येथे आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिवस साजरा करण्यात आला.
 याप्रसंगी खेळाडूं,क्रीडाप्रेमी आणि संघटक यांच्यासाठी एक चर्चासत्र आयोजित केले होते या चर्चासत्रात राष्ट्रीय मुष्टियुद्ध पंच सुनील नेवरेकर यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक दिन साजरा करण्यामागची भूमिका सांगितली. सर्व वयोगटातील लोकांना फिटनेस खेळ आणि शारीरिक हालचालीसाठी प्रोत्साहित करणे आणि उत्कृष्टता मैत्री आणि आदर या ऑलिम्पिक मूल्याचा प्रसार आणि प्रचार करणे यासाठी गठित झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अधिकृत स्थापना दिवस संयुक्त राष्ट्र संघाने 20 डिसेंबर 2002 रोजी मान्य केलेल्या ठरावानुसार 23 जून 2003 पासून अधिकृतरित्या साजरा केला. जाऊ लागला अशी माहिती श्री नेवरेकर यांनी दिली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पराग गानू हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती असफिया सय्यद यांनी केले याप्रसंगी कोकणस्थ परिवार ,पुणे ,क्रीडा महर्षी हरिभाऊ साने प्रतिष्ठान,क्रीडा कट्टा आदी संस्थांचे कार्यकर्ते आणि खेळाडू उपस्थित होते
दिनेश पाडाळे यांनी स्वागत केले.अमोल कर्चे यांनी प्रास्तविक केले.चंद्रकांत खराटे यांनी उपस्थित यांचे आभार मानले. 
 कार्यक्रम यशस्विते करिता संदीप जाधव, संकेत शर्मा,अक्षय पवळ,विजय उत्तेकर,गणेश निकम आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

पुण्याची धुरा श्रीतेज पवारकडेविफा आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धा; १८ सदस्यीय ज्युनियर मुले संघाचा पहिला सामना गुरुवारी

बेकायदेशीररित्या कार्यरत असलेल्या बलाढ्य प्रवासी कॅब कंपन्यांवर कारवाई करा**माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य यांची मागणी ; दि.४ सप्टेंबर रोजी ९ हजार कॅब चालक- मालक यांचा कॅब घेऊन मंत्रालयावर मोर्चा

जय मल्हार' भव्य रांगोळी प्रदर्शनात साकारणार श्री खंडोबा चरित्र*श्रीरंग कलादर्पण फाउंडेशनच्या वतीने आयोजन ; दि. ३० एप्रिल ते ३ मे दरम्यान बालगंधर्व कलादालनात विनामूल्य पाहण्याची संधी ; ३डी व पाण्यावरच्या अनोख्या रांगोळ्यांचा समावेश