शेकडो दिव्यांनी उजळले 'दगडूशेठ' गणपती मंदिरश्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजन

शेकडो दिव्यांनी उजळले 'दगडूशेठ' गणपती मंदिर
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजन 

पुणे : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर शेकडो दिव्यांनी उजळले. मंदिरातील गाभारा, सभामंडप सह कळसापर्यंत प्रज्वलित केलेल्या हजारो दिव्यांच्या प्रकाशात संपूर्ण मंदिर उजळून निघाले. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबत मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते.

ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, बळीराजावर जे संकट आले आले, ते दूर होवो आणि महाराष्ट्र व संपूर्ण भारतात सुख-शांती नांदो अशी प्रार्थना यावेळी गणरायाचरणी करण्यात आली. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त साकारलेल्या अन्नकोटामध्ये तब्बल ५५१ हून अधिक प्रकारचे पदार्थ मांडण्यात आले होते. 

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहादत दिनाच्या तसेच चार साहिबजाद्यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ

भाडेकर आणि पोलीस वेरिफिकेशन नसल्याने गुन्हे दाखल करत आहेत