स्व. नेल्सन पॉल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘बॉस्को कप‌’ फुटबॉल स्पर्धा !!नाईज बॉईज, मस्का इलेव्हन, खडकी ब्ल्युज्‌, जीओजी, फाल्कन एफसी, उत्कर्ष क्रिडा मंच, स्पोर्टीको एफसी फेरीत !!


स्व. नेल्सन पॉल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘बॉस्को कप‌’ फुटबॉल स्पर्धा !!

नाईज बॉईज, मस्का इलेव्हन, खडकी ब्ल्युज्‌, जीओजी, फाल्कन एफसी, उत्कर्ष क्रिडा मंच, स्पोर्टीको एफसी फेरीत !!

पुणे, १२ नोव्हेंबरः येरवडा युनिटचे सेलेझियन को-ऑपरेटर्स, ‘सॅक्रिड हार्ड पॅरिश‌’ आणि डॉन बॉस्को एज्युकेशनल कॉम्प्लेक्स्‌-येरवडा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्व. नेल्सन पॉल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित ‘बॉस्को कप‌’ फुटबॉल स्पर्धेत नाईज बॉईज, मस्का इलेव्हन, खडकी ब्ल्युज्‌, जीओजी, फाल्कन एफसी, उत्कर्ष क्रिडा मंच आणि स्पोर्टीको एफसी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून उपांत्यपुर्व फेरी गाठली.

येरवडा येथील डॉन बॉस्को स्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत नॉईज बॉईज संघाने फाल्कन्स्‌ एफसी क संघाचा टायब्रेकमध्ये ४-२ असा पराभव केला. पूर्णवेळ गोलशुन्य बरोबरी झाल्याने सामन्यात टायब्रेकपध्दतीचा अवलंब करण्यात आला. यामध्ये नॉईज बॉईजकडून दिनेश राठोड, प्रतिक शिंदे, निरंजन खुडे आणि उत्कर्ष आंम्रे यांनी तर, फाल्कन्स्‌ एफसी संघाकडून सुनित गुप्ते आणि शनुप नायर यांनी गोल नोंदविले. दुसऱ्या सामन्यात मस्का इलेव्हनने केएमपी इलेव्हनचा २-१ असा पराभव केला. मस्का संघाकडून देवांश सय्यद आणि अर्चित पाटोळे यांनी गोल केले. भुषण पी., अर्जुन कुमार आणि धवल एम. यांनी नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर जीओजी ब संघाने बिटा एफसी संघाचा ३-० असा पराभव केला.

खडकी ब्ल्युज्‌ संघाने आर्यन्स्‌ एफसी संघाचा टायब्रेकमध्ये ५-२ असा पराभव केला. सामन्यात खडकी संघाकडून शोएब सालमनी याने तर, आर्यन्स्‌ संघाकडून सार्थक चौहान याने गोल केले. पूर्णवेळ १-१ अशी बरोबरी झाल्याने सामन्यात टायब्रेकपध्दतीचा अवलंब करण्यात आला. टायब्रेकमध्ये ॲश्ले व्हिन्सेंट, शोएब सालमनी, सनी ओव्हळ आणि अथर्व कुमार यांनी खडकी ब्ल्युज्‌ संघासाठी गोल नोंदविले. करण प्रजापती, अखिलेश रिकामे आणि युवराज गुरांग यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर फाल्कन एफसी ब संघाने हायलँडर्स एफसीचा ३-१ असा पराभव केला. सिध्दार्थ नंदे याने केलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर स्पोर्टीको एफसीने पुना सोशल्स्‌चा १-० असा पराभव केला. उत्कर्ष क्रिडा मंच ब संघाने सडनडेथमध्ये रोअर्स एफसी संघाचा ७-६ असा पराभव करून आगेकूच केली.

स्पर्धेचा निकालः उप-उपांत्यपुर्व फेरीः
१) नॉईज बॉईजः ४ (दिनेश राठोड, प्रतिक शिंदे, निरंजन खुडे, उत्कर्ष आंम्रे) टायब्रेकमध्ये वि.वि. फाल्कन्स्‌ एफसी कः २ (सुनित गुप्ते, शनुप नायर); पूर्णवेळः ०-०;
२) मस्का इलेव्हनः २ (देवांश सय्यद ८ मि. पास- सृजन मारसिलन; अर्चित पाटोळे ४२ मि. पास- सृजन मारसिलन) वि.वि. केएमपी इलेव्हनः १ (अजिंक्य श्रीपाद ३५ मि.);
३) खडकी ब्ल्युज्‌ः ५ (शोएब सालमनी ३९ मि., ॲश्ले व्हिन्सेंट, शोएब सालमनी, सनी ओव्हळ, अथर्व कुमार) टायब्रेकमध्ये वि.वि. आर्यन्स्‌ एफसीः २ (सार्थक चौहान ३३ मि., शरण घोडके); पूर्ण वेळः १-१;
४) जीओजी बः ३ (भुषण पी. ४ मि., अर्जुन कुमार १२ मि., धवल एम. ४४ मि.) वि.वि. बिटा एफसीः ०;
५) फाल्कन एफसी बः ३ (करण प्रजापती १८ मि., अखिलेश रिकामे २४ मि., युवराज गुरांग ४२ मि.) वि.वि. हायलँडर्स एफसीः १ (सिध्दार्थ इंगवले २६ मि.);
६) स्पोर्टीको एफसीः १ (सिध्दार्थ नंदे ३ मि. पास- शौर्य बदाडे) वि.वि. पुना सोशल्स्‌ः ०;
७) उत्कर्ष क्रिडा मंच बः ७ (सरताज सहा, आदित्य हंचाटे, अव्देत मदन, स्वराज पाटील, स्वराज साखरे, वेदांत वाघ, स्वगम डी.) सडनडेथमध्ये वि.वि. रोअर्स एफसीः ६ (वैभव राउत, शिवम पटेल, साहील कदम, अब्दुल खान, ऋतुराज पाटील, तन्मय बर्वे); पूर्णवेळः ०-०; टायब्रेकः ५-५.


Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहादत दिनाच्या तसेच चार साहिबजाद्यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ

भाडेकर आणि पोलीस वेरिफिकेशन नसल्याने गुन्हे दाखल करत आहेत