नू. म. वि. प्रशालेच्या वीरेन न्यायनीतची व्यावसायिक टेनिस क्रिकेटच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

नू. म. वि. प्रशालेच्या वीरेन न्यायनीतची व्यावसायिक टेनिस क्रिकेटच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

पुणे : नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, पुणे येथील इयत्ता १० वी ‘ब’ मध्ये शिकणारा होतकरू क्रिकेटपटू वीरेन प्रदीप न्यायनीत याची इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग (ISPL) या व्यावसायिक टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे. १९ वर्षांखालील खेळाडूंच्या गटातून हैदराबादच्या ‘फाल्कन रायझर्स’ संघाने वीरेनला तब्बल तीन लाख रुपयांच्या खेळाडू श्रेणीत स्थान दिले आहे.

वीरेनने इयत्ता पाचवीपासूनच नू. म. वि. प्रशालेच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शालेय स्तरापासूनच क्रिकेटमधील कौशल्य, मेहनत, जिद्द आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली. शालेय क्रिकेटमधील त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीला आता व्यावसायिक टेनिस क्रिकेटच्या राष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली आहे. त्याच्या या निवडीमुळे नू. म. वि. प्रशालेच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

वीरेनच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळा समिती अध्यक्ष श्री. पराग ठाकूर सर, प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती काळे मॅडम, पर्यवेक्षिका श्रीमती जंगम मॅडम, पर्यवेक्षक श्री. खरात सर व श्री. भिसे सर, क्रीडा प्रमुख श्री. यमगर सर, वर्गशिक्षिका श्रीमती भालेराव मॅडम, क्रिकेट खेळ मार्गदर्शक श्री. साळवी सर तसेच सर्व शिक्षक वृंद यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील क्रिकेट कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

वीरेनच्या या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती साकार करण्याची प्रेरणा मिळणार आहे.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहादत दिनाच्या तसेच चार साहिबजाद्यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ

भाडेकर आणि पोलीस वेरिफिकेशन नसल्याने गुन्हे दाखल करत आहेत