पुण्यात लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३२ व्या जयंतीनिमित्त दिपक कसबे यांचा सत्कार
## पुण्यात लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३२ व्या जयंतीनिमित्त दिपक कसबे यांचा सत्कार
**पुणे, दि. १५ नोव्हेंबर :** क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या २३२ व्या जयंतीनिमित्त लहुजी वस्ताद स्मारक समितीच्या वतीने पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे माजी सचिव दिपक भाऊ कसबे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
डॉ. अण्णाभाऊ साठे पुतळा, सारसबाग चौक येथे 'फकीरा' कादंबरीवर आधारित शिल्प उभारण्यात येत आहे. हे शिल्प दिपक भाऊ कसबे यांच्या संकल्पनेतून साकार होत आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने या शिल्पाचे काम सुरू असून, यासाठी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथजी भीमाले यांनी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
या कार्याबद्दल दिपक भाऊ कसबे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या शिल्पासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भीमाले, महापौर आणि गटनेते यांचेही मातंग समाजाच्या वतीने कौतुक करण्यात आले.
दुसरा सत्कार माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे यांची मुलगी डॉ. सृष्टी लक्ष्मण आरडे यांचा करण्यात आला. सृष्टी आरडे डॉक्टर झाल्याबद्दल समाजाच्या वतीने तिचा विशेष सन्मान करण्यात आला.
Comments
Post a Comment