सरला राठोड सोशल वेल्फेअर फाउंडेशन, पुणे यांच्यावतीने पळसखेड येथे दुष्काळग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटपजळगाव:

सरला राठोड सोशल वेल्फेअर फाउंडेशन, पुणे यांच्यावतीने पळसखेड येथे दुष्काळग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
जळगाव:
सरला राठोड सोशल वेल्फेअर फाउंडेशन, पुणे यांच्यावतीने जळगाव जिल्ह्यातील पळसखेड या गावात दुष्काळग्रस्त शेतकरी व गरजू कुटुंबीयांसाठी विशेष मदत उपक्रम राबवण्यात आला. "चला, मदतीचा हात पुढे करूया!" या प्रेरणेने हाती घेतलेल्या या उपक्रमांतर्गत पळसखेड गावातील ५० पेक्षा जास्त दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष सौ रेणुका राठोड आणि पदाधिकारी उपस्थित होते.
या संकटकाळात फाउंडेशनकडून मिळालेल्या मदतीमुळे ग्रामीण भागातील या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून, पुणे येथील या संस्थेच्या संवेदनशील व समाजोपयोगी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. फाऊंडेशनतर्फे यापुढेही असे जनहितार्थ उपक्रम सुरू ठेवण्यात येणार आहेत.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहादत दिनाच्या तसेच चार साहिबजाद्यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ

भाडेकर आणि पोलीस वेरिफिकेशन नसल्याने गुन्हे दाखल करत आहेत