श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’ च्या हिंदी ॲपचे लोकार्पण!*
*श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’ च्या हिंदी ॲपचे लोकार्पण!*
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. 'धर्मश्री', पुणे येथे अँपचे उद्घाटन झाल्यावर प.पू. महाराजांनी पंचांग ॲपचे कौतुक करत शुभाशीर्वाद दिले. प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या हस्ते हे लोकार्पण झाल्याबद्दल ‘सनातन पंचांग’ समूहाच्या वतीने त्यांच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या वेळी सनातन पंचांग समूहाच्या वतीने श्री. पराग गोखले आणि कु. क्रांती पेटकर यांच्या हस्ते प.पू. महाराजांना शाल, श्रीफळ अन् भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
सूत्रसंचालक श्री. गोपाळ उपाध्ये यांनी सनातन पंचांग विषयी उपस्थितांना माहिती दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून धर्मप्रसार करणारे हे ‘सनातन पंचांग’ ॲप अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) या दोन्ही प्रणालींवर मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलुगु आणि तमिळ अशा सात विविध भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे. आतापर्यंत अँड्रॉइड प्रणालीवर तब्बल ४१ लाखांहून अधिक, तर आयओएस प्रणालीवर ७ लाखांहून अधिक भाविकांनी हे ॲप डाउनलोड करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आपण स्वतः, आपले सर्व नातेवाईक, मित्रपरिवार, शेजारी आणि कार्यालयीन सहकारी यांना हे बहुपयोगी ॲप डाउनलोड करण्यास सांगून भारतीय संस्कृती अन् धर्मकार्याच्या प्रसारात मोलाचा वाटा उचलावा, असे नम्र आवाहन ‘सनातन पंचांग’ समूहाकडून करण्यात येत आहे.
दैनंदिन जीवनात आवश्यक असणारी सर्व माहिती ‘सनातन पंचांग ॲप’मध्ये अत्यंत सुटसुटीतपणे देण्यात आली आहे. यामध्ये शुभमुहूर्त, सण-उत्सव, धर्मशिक्षण, आरोग्यविषयक उपयुक्त टिप्स आणि प्रेरणादायी सुविचार यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय संकष्टी चतुर्थी, एकादशी यांसारख्या महत्त्वाच्या तिथींच्या पूर्वसूचना (नोटिफिकेशन्स), दिनविशेष, होमस्क्रीन विजेट आणि रिमाइंडर यांसारख्या अनेक आधुनिक अन् सोयीस्कर सुविधा या ॲपमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे दैनंदिन धार्मिक आचरण अधिक सोपे होते.
Comments
Post a Comment