श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी आमदार बापूसाहेब पठारे यांची सर्वानुमते नियुक्ती



श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी आमदार बापूसाहेब पठारे यांची सर्वानुमते नियुक्ती


 
चंदननगर, पुणे येथील प्रतिष्ठित साईबाबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.
यावेळी ट्रस्टच्या अन्य पदाधिकाऱ्यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये अध्यक्ष देवेंद्र खवले , वाईस चेयरमैन महेंद्र पठारे, उपाध्यक्ष सुदामराव मते, कार्याध्यक्ष व महाव्यवस्थापकपदी निर्मलकुमार अंचलिया, कोषाध्यक्षपदी पंकज शिंदे, तर कायदेशीर सल्लागारपदी एडवोकेट दिलीप जेधे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर व्यवस्थापनाबरोबरच विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, वैद्यकीय आणि शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. ट्रस्टच्या वतीने अनेक निःशुल्क सेवा प्रकल्प, रक्तदान शिबिरे, कर्करोग तपासणी शिबिरे तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने आयोजित केले जातात.
नवनियुक्त चेअरमन,आमदार बापूसाहेब पठारे यांनी भविष्यात मंदिराचा विस्तार करण्याचा तसेच ट्रस्टच्या माध्यमातून संचालित मातोश्री अनुसया भवन हे समाजातील गरीब, गरजू आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीनिमित्त विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच समाजातील मान्यवर व्यक्तींनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहादत दिनाच्या तसेच चार साहिबजाद्यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ

भाडेकर आणि पोलीस वेरिफिकेशन नसल्याने गुन्हे दाखल करत आहेत