क्षमतेतील वाढीमुळे सेकोचे जागतिक नेटवर्क मजबूत, भविष्यातील मागणी पूर्ण करण्यास कंपनी पूर्णपणे सज्ज,

क्षमतेतील वाढीमुळे सेकोचे जागतिक नेटवर्क मजबूत, भविष्यातील मागणी पूर्ण करण्यास कंपनी पूर्णपणे सज्ज,

पुणे, 27 ऑक्टोबर 2026: मेटल-कटिंग सोल्यूशन्स देणारी जागतिक कंपनी सेको ने आज भारतात 30 वर्षे पूर्ण केली आणि पुण्यातल्या आपल्या उत्पादनाचा कारभार कसा वाढवलाय, हे सांगितलं. हा टप्पा सेकोच्या जागतिक नेटवर्कमध्ये पुण्यातील पुनिटच्या एका महत्त्वाच्या मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग आणि आर अँड डी (R&D) हब म्हणून झालेल्या प्रगतीचे प्रतीक आहे. घेथील क्षमता भारत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील औद्योगिक ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सक्षम आहेत

पुण्यातला हा प्रकल्प सेकोच्या जागतिक दर्जानुसार इन्सर्ट्स, टूल्स आणि टूलहोलार्स बनवतो. भारतात तयार झालेले हे प्रॉडक्ट्स सेकोच्या जागतिक वितरण जाळ्यात जातात आणि जगभरातल्या ग्राहकांना मदत करतात. भविष्यातली मागणी पूर्ण करण्यासाठी सेको आपल्या या उत्पादन कारभाराचा आणखी विस्तार करत आहे.

पुण्यातल्या आपल्या उत्पादनाचा विस्तार करून रोको आपली तांत्रिक क्षमता, अचूकता आणि उत्पादकतेवर भर देत वाढत्या औद्योगिक गरजा पूर्ण करण्याची तयारी मजबूत करत आहे. पुण्यातल्या कारभाराचा असाच विस्तार करत राहून, उत्पादकांना त्यांची गुणवत्ता, कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवायला मदत करणे, तसेच भविष्यातली वाढती मागणी सहज पूर्ण करणे हा कंपनीचा उद्देश आहे.

या सोहळ्याबद्दल बोलताना, सेकोचे अध्यक्ष स्टीफन स्टीन्स्ट्रप म्हणाले: "भारताच्या औद्योगिक प्रगतीमध्ये इथल्या मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची खूप महत्त्वाची भूमिका आहे. पुण्यातली आपली उत्पादन, इंजिनिअरिंग आणि R&D क्षमता अधिक मजबूत करून, अचूकता, उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी उत्पादकांना लागणारे तंत्रज्ञान आणि कौशल्य पुरवणे हा आमचा उद्देश आहे. सेको इंडियाने 30 वर्षे पूर्ण केली असताना, हा विस्तार भारतीय उद्योगांची सेवा करणाऱ्या, इथल्या एकूणच मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्थेला हातभार लावणाऱ्या आणि भारताला एक जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याच्या स्वताला साथ देणाऱ्या क्षमता निर्माण करण्याच्या आमच्या कटिबद्धतेला दाखवून देतो."

या सोहळ्यावर बोलताना, सेको इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि हेड इन्सर्ट प्रोडक्शन्, अतुल मोहयोडकर म्हणाले: "गेल्या 30 वर्षांत आमचा हा कारभार जागतिक सेको नेटवर्कमध्ये मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनिअरिंग आणि R&D साठीचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू बनला आहे. या कारभाराचा असाच विस्तार करत आम्ही आमचा जागतिक दर्जा बायम ठेवत भविष्यातली मागणी पूर्ण करण्याची सेकोची क्षमता आणखी मजबूत करत आहोत."

सेकोच्या जागतिक मॅन्युफॅक्चरिंग आणि नावीन्यपूर्ण नेटवर्कमध्ये पुण्यातल्या या केंद्राची खूप महत्त्वाची भूमिका आहे. यामध्ये उत्पादन, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि प्रोसेस डेव्हलपमेंट अशा सर्व क्षमता समाविष्ट आहेत. इथले R&D सेंटर कंपनीच्या जागतिक कारभाराला मदत करते, तर इथल्या टूलिंग सोल्यूशन्स आणि तांत्रिक कौशल्याचा फायदा एरोस्पेस, ऑटोमोटिव्ह, जनरल इंजिनिअरिंग आणि मेडिकल मॅन्युफॅक्चरिंग यांसारख्या क्षेत्रांना होतो. यामुळे ग्राहकांना मशिनिंगमधील अडचणी सोडवायला आणि त्यांची उत्पादकता व मॅन्युफॅक्चरिंगची कार्यक्षमता सुधारायला मदत होते.

सेको इंडियाची थेट कर्मचाऱ्यांची संख्या सुरुवातीच्या काळापासून आतापर्यंत चार पटीने वाढली आहे, आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडूनच मुख्य उत्पादनाची कामे केली जातात. भविष्यातही, बदलत्या उद्योगांच्या गरजेनुसार सेबो आपली उत्पादन क्षमता, तांत्रिक कौशल्य आणि R&D बळ मजबूत करत राहील. तंत्रज्ञान, नावीन्यपूर्णता आणि भारतीय बाजाराच्या गरजेनुसार

112

बनवलेल्या सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करून, कंपनीचा भारतीय उत्पादकांची वाढ आणि स्पर्धात्मकता वाढवण्यास मदत करणे तसेच भारताच्या मोऊया औद्योगिक विकासाला हातभार लावण्याचा उद्देश आहे.

About Seco

स्वीडनच्या फॅगरस्टा (Fagersta) येथे मूळ असलेल्या आणि ७५ हून अधिक देशांमध्ये उपस्थिती असलेल्या, सेकी ही इंडेक्सएबल मिलिंग, सॉलिड मिलिंग, टर्निंग, होलमेकिंग, ग्रेडिंग आणि टूलिंग सिस्टम्ससाठी मेटल कटिंग सोल्यूशन्स पुरवणारी जागतिक अग्रगण्य कंपनी आहे. जवळपास १०० वर्षांपासून, सेकोने अत्यंत अचूक मशिनिंग म्हणजे हाय-प्रिसिजन मशिनिंग आणि उच्च दर्जाचे उत्पादन सुनिश्चित करत संपूर्ण उत्पादन प्रवासात उत्कृष्टतेचा वारसा जपला आहे आणि प्रगती साधली आहे

Comments

Popular posts from this blog

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या शहादत दिनाच्या तसेच चार साहिबजाद्यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ

भाडेकर आणि पोलीस वेरिफिकेशन नसल्याने गुन्हे दाखल करत आहेत