डीएचएल एक्स्प्रेस इंडियाकडून दिवाळीला पिवळ्या रंगाचा स्पर्श: शिपमेंट्सवर 60% पर्यंत सणासुदीची सवलत
डीएचएल एक्स्प्रेस इंडियाकडून दिवाळीला पिवळ्या रंगाचा स्पर्श: शिपमेंट्सवर 60% पर्यंत सणासुदीची सवलत
सवलतीचा लाभ घेऊ इच्छिणारे ग्राहक सर्व्हिस पॉइंटवर FESTIVAL60 हा प्रोमो कोड वापरू शकतात किंवा dhl.com ला भेट देऊ शकतात
· सणासुदीची ही ऑफर 14 नोव्हेंबर 2026 पर्यंत वैध आहे
ग्राहक डीएचएल गोग्रीन प्लस सेवेद्वारेही आपले शिपमेंट पाठवू शकतात; ही सेवा त्यांच्या शिपमेंट्सशी संबंधित हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास मदत करते
मुंबई, 25 ऑक्टोबर 2026: जगातील आघाडीची आंतरराष्ट्रीय एक्स्प्रेस सेवा पुरवठादार कंपनी डीएचएल एक्स्प्रेस, संपूर्ण भारतातील ग्राहकांसाठी खास सणासुदीच्या सवलतींसह दिवाळीचा आनंद साजरा करत आहे. मर्यादित कालावधीसाठी, म्हणजेच 14 नोव्हेंबर 2026 पर्यंत उपलब्ध असलेल्या या ऑफरमध्ये ग्राहकांना आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत शिपमेंट्सवर 60% पर्यंत सवलत मिळते. भारतभर आणि जगभरातील कुटुंबीयांना व प्रियजनांना भेटवस्तू, मिठाई आणि सणाच्या शुभेच्छा पाठवू इच्छिणारे ग्राहक डीएचएलच्या वेबसाइटवर (dhl.com) किंवा डीएचएल सर्व्हिस पॉइंटवर FESTIVAL60 हा प्रोमो कोड वापरू शकतात.ग्राहक डीएचएल गोग्रीन प्लस सेवा निवडू शकतात. शाश्वत विमान इंधनाचा (एसएएफ) वापर करून ही सेवा त्यांच्या शिपमेंट्सशी संबंधित हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास मदत करते. “बुक अँड क्लेम” पद्धतीद्वारे, एसएएफचे पर्यावरणविषयक गुणधर्म सहभागी शिपमेंट्सना दिले जातात.
डीएचएल एक्स्प्रेस इंडियाचे विक्री व विपणन विभागाचे उपाध्यक्ष संदीप जुनेजा म्हणाले, “दिवाळी म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या माणसांसोबत सण साजरा करणे, मग ते कितीही दूर असले तरी. डीएचएल एक्स्प्रेसमध्ये, जगात ते कुठेही असले तरी त्यांच्या दारापर्यंत तुमच्याकडून काहीतरी अर्थपूर्ण पोहोचवून आम्ही ही नाती जोडणे शक्य करतो. आमच्या सणासुदीच्या ऑफरमुळे आमच्या ग्राहकांना भारतभर आणि त्यापलीकडे असलेल्या कुटुंबीयांसोबत व प्रियजनांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेणे थोडे अधिक सोपे व्हावे, अशी आम्हाला आशा आहे.”
डीएचएलच्या 220 पेक्षा जास्त देश आणि प्रदेशांमध्ये पसरलेल्या विस्तृत जागतिक नेटवर्कमुळे, ग्राहकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत शिपमेंटची स्थिती पाहण्याची सुविधा, तसेच सुरळीत व त्रासमुक्त डिलिव्हरी अनुभवासाठी एसएमएस आणि ईमेलद्वारे आधीच मिळणारी माहिती, यांचा लाभ घेता येतो. ऑफरबद्दल चौकशी करण्यासाठी ग्राहक डीएचएल एक्स्प्रेसच्या टोल-फ्री क्रमांकावर 1800 30 345 वर कॉल करू शकतात, dhl.com
Comments
Post a Comment