DAIMANTÉ चे नवे कलेक्शन 'लाइट लक्झरी'; खास, अर्थपूर्ण तरीही अगदी हलके आणि सहजसोपे दागिने

DAIMANTÉ चे नवे कलेक्शन 'लाइट लक्झरी'; खास, अर्थपूर्ण तरीही अगदी हलके आणि सहजसोपे दागिने
 
पुणे, सप्टेंबर २०२६: DAIMANTÉ या मॉडर्न लॅब-ग्रोन डायमंड ब्रँडने आपल्या 'लाइट लक्झरी' (Lite Luxury) या नव्या पेंडंट कलेक्शनच्या लाँचची घोषणा केली आहे. ‘Talisman’' या सिग्नेचर कलेक्शन'मधून विशेष अर्थपूर्ण दागिन्यांना एक नवी ओळख देणाऱ्या ब्रँडचे हे नवे कलेक्शन आपल्या साध्या पण आकर्षक डिझाइन्समधून खास प्रतीके व भावनांना तुमच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनवते.
 
ब्रँडच्या लोकप्रिय ‘Talisman’ कलेक्शन'चाच एक पुढचा भाग म्हणून 'लाइट लक्झरी' कलेक्शन तयार करण्यात आले आहे. हे नवे कलेक्शन अगदी त्याच भावना आणि प्रतीकांना सुबक, आधुनिक आणि हलक्या डिझाइन्समध्ये सादर करते. हे दागिने तुम्ही रोजच्या रोज, अगदी सहज परिधान करू शकता. हे पेंडंट्स दिसायला अतिशय नाजूक आणि वजनाने हलके आहेत, ज्यामुळे आजच्या ग्राहकांना आपल्या आवडीच्या डिझाइन्सचे स्वतःचे एक कलेक्शन तयार करणे आणि ते दररोज वापरणे सहज शक्य होईल.
 
या कलेक्शनमध्ये फुलपाखरू, घुबड, फूल, ध्रुवतारा (नॉर्थ स्टार), सूर्य, ड्रॅगनफ्लाय, सेल्टिक नॉट, सर्कल आणि आर्च यांसारख्या खास चिन्हांचा व प्रतीकांचा वापर करण्यात आला आहे. प्रत्येक डिझाइनमागे एक सखोल अर्थ दडला आहे, त्याच वेळी त्याला आजच्या काळातील आधुनिक आणि सुबक लुक देण्यात आला आहे जो प्रत्येक स्टाईलवर खुलून दिसतो.
 
DAIMANTÉ चे संस्थापक सनी सिंग म्हणाले, "आम्हाला रोजच्या साध्या क्षणांनाही खास आणि अर्थपूर्ण बनवतील असे दागिने तयार करायचे होते, आणि 'लाइट लक्झरी' याच विचारातून साकारले आहे. हे आमच्या लोकप्रिय ‘Talisman’ कलेक्शन'चेच एक हलके रूप आहे. यात तीच वैशिष्ट्ये आणि सखोल अर्थ दडलेला आहे, पण याची डिझाइन्स अतिशय सोपे आणि वजनाला हलकी ठेवण्यात आली आहेत जेणेकरून लोक ती रोज सहजपणे वापरू शकतील."
 
हे कलेक्शन लॅब-ग्रोन डायमंड्सपासून बनवले गेले असून ते उत्कृष्ट फिनिशिंगसह यलो गोल्ड, रोझ गोल्ड आणि व्हाईट गोल्डमध्ये उपलब्ध आहे. या लाँचसह, DAIMANTÉ ने उत्कृष्ट कारागिरी आणि नाविन्यपूर्ण डिझाइन्स सादर करण्याची आपली परंपरा पुढे चालू ठेवली आहे.
 
जर तुम्ही हिऱ्यांचे दागिने पहिल्यांदाच खरेदी करत असाल तर 'लाइट लक्झरी' कलेक्शनच्या माध्यमातून DAIMANTÉ च्या विश्वाशी जोडले जाण्याची ही सुवर्णसंधी आहे. हे कलेक्शन उत्कृष्ट डिझाइन, रोजचा वापर आणि शाश्वत मूल्य यांचा एक उत्तम मेळ घालते. या नव्या लाँचसह DAIMANTÉ ने पुन्हा एकदा हे सिद्ध केले आहे की, ते केवळ शोभेसाठी दागिने बनवत नाहीत, तर व्यक्तीची ओळख, विचार आणि त्याचे विचार सांगणारे दागिने तयार करतात.
DAIMANTÉ बद्दल:
DAIMANTÉ हा एक फाईन लक्झरी ज्वेलरी ब्रँड आहे, जो समकालीन डिझाइन्समध्ये सखोल अर्थ असलेले लॅब-ग्रोन डायमंड पेंडंट्स तयार करतो. त्यांच्या 'मॉडर्न Talisman' चे प्रत्येक डिझाइन खास विचार आणि प्रतीकांचे प्रतिनिधित्व करते. भारतीय कारागिरांनी हाताने तयार केलेली ही एआय-आधारित डिझाइन्स दागिन्यांना एक नवा अर्थ देतात. ‘डिझाइन्ड बाय इंटेलिजन्स, क्राफ्टेड फॉर इटरनिटी’ या तत्त्वावर चालणारे त्यांचे मुख्य ‘Talisman’ कलेक्शन' नेहमीच ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे, तर नवे 'लाइट लक्झरी' कलेक्शन पहिल्यांदाच लॅब-ग्रोन डायमंड खरेदी करणाऱ्यांसाठी आणि गिफ्ट देण्यासाठी एक उत्तम पर्याय बनले आहे.

https://daimante.com/

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*