दगडूशेठ' च्या प्रेम मंदिरावर आकाशात प्रकाशले गणराय*तब्बल ३०० ड्रोनच्या माध्यमातून साकारले दगडूशेठ गणपती, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिकृती
*'दगडूशेठ' च्या प्रेम मंदिरावर आकाशात प्रकाशले गणराय*
तब्बल ३०० ड्रोनच्या माध्यमातून साकारले दगडूशेठ गणपती, छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिकृती
पुणे : काळोखलेल्या आकाशात एकापाठोपाठ एक उजळणारे शेकडो दिवे... त्या प्रकाशातून साकारत जाणारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची भव्य प्रतिकृती आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांची प्रतिमा... अशा नेत्रदीपक वातावरणाने 'दगडूशेठ' च्या प्रेम मंदिरावर आकाश प्रकाशले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३४ व्या वर्षीच्या गणेशोत्सवात ३०० ड्रोनच्या माध्यमातून भव्य प्रकाशोत्सव साकारण्यात आला. जय गणेश, सुवर्णयुग तरुण मंडळ, गणपती बाप्पा मोरया... अशी अक्षरे देखील ड्रोनच्या माध्यमातून साकारण्यात आली होती. जुगनू ड्रोन शो यांच्या वतीने हा शो साकारण्यात आला.
सुमारे १२ मिनिटांच्या या प्रकाशोत्सवात ड्रोनच्या माध्यमातून आकाशात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची प्रतिकृती आणि भगवा ध्वजही आकाशात साकार झाला. हजारो भाविकांनी हा नेत्रदीपक सोहळा अनुभवला.
Comments
Post a Comment