व्योहर-डेक्कन जिमखाना करंडक’ क्यु स्पोर्ट्स आंतरक्लब लीग २०२६ स्पर्धा !!आरसीबीसी लेजंड्स सलग दोन विजय; कोरिंथियन ग्लॅडिएटर्स, पुना क्लब मॅजिशियन्स् संघांची कडवी झुंझ !!
‘व्योहर-डेक्कन जिमखाना करंडक’ क्यु स्पोर्ट्स आंतरक्लब लीग २०२६ स्पर्धा !!
आरसीबीसी लेजंड्स सलग दोन विजय; कोरिंथियन ग्लॅडिएटर्स, पुना क्लब मॅजिशियन्स् संघांची कडवी झुंझ !!
पुणे, ७ सप्टेंबरः डेक्कन जिमखाना क्लबच्यावतीने आयोजित ‘व्योहर-डेक्कन जिमखाना करंडक’ क्यु स्पोर्ट्स आंतरक्लब लीग २०२६ स्पर्धेत आरसीबीसी लेजंड्स संघाने सलग दोन तर, कोरिंथियन ग्लॅडिएटर्स आणि पुना क्लब मॅजिशियन्स् संघांनी एकमेकांचा पराभव करून जोरदार टक्कर देत कडवी झुंझ दिली.
पुना क्लब, आरसीबीसी क्लब आणि कोरिंथियन क्लबच्या बिलीयर्डस् आणि स्नुकर हॉलमध्ये झालेल्या या सामन्यात कोरिंथियन ग्लॅडिएटर्स संघाने पुना क्लब मॅजिशियन्स् संघाचा ३-२ असा संघर्षपूर्ण पराभव केला. कोरिंथियनच्या राजिव लाल याने पुना क्लबच्या कपिल पंजाबी याचा १५१-१४४ असा पराभव केला. पुना क्लबच्या विग्नेश संघवी याने विराफ बोकदावाला याचा ६२-१८ असा सहज पराभव करून १-१ अशी बरोबरी निर्माण केली. दुहेरीच्या सामन्यात कोरिंथियनच्या झुबिर शेख व विनीत पारकेरीया यांनी अंगद सहानी व अनिल काकडे या जोडीचा ६२-४९ असा पराभव केला. कोरिंथियनच्या सिध्दार्थ वर्मा याचा पुना क्लबच्या दिनेश मेहतानी याने ३५-४७ असा पराभव करून २-२ अशी बरोबरी निर्माण केली. निर्णायक सामन्यात कोरिंथियनच्या रजत फरसवाल याने मानांकित व पुना क्लबचा खेळाडू सुरज राठी याचा ७३-२९ असा पराभव करून अनपेक्षित निकालासह संघाचा विजय निश्चित केला.
परतीच्या सामन्यात पुना क्लब मॅजिशियन्स् संघाने कोरिंथियन ग्लॅडिएटर्स संघावर ३-२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवून पराभवाची परतफेड केली. सामन्यात पुना क्लबच्या सुरज राठी, विग्नेश संघवी आणि कपिल पंजाबी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचे पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
आरसीबीसी लेजंड्स संघाने आरसीबीसी ऑल स्टार संघाचा घरच्या आणि परतीच्या लढतीमध्ये ५-० आणि ४-१ असा सलग पराभव करून दोन विजयांची नोंद केली. आरसीबीसीच्या ऋषी रामय्या, विजय नचानी, पंकज सहानी, झुबिन रजिस्ट्रार, झकील पटेल आणि झुबिन रजिस्ट्रार या खेळाडूंनी विजयी कामगिरी केली.
सामन्याचा निकालः गटसाखळी फेरीः
आरसीबीसी लेजंड्स वि.वि. आरसीबीसी ऑल स्टार ५-० (ऋषी रामय्या वि.वि. रमेश शहा १०८-९८; मजझर ताहेरबॉय पराभूत वि. अनुप मल्होत्रा ३४-६४; विजय नचानी वि.वि. समीर सावला १५३-१३१; पंकज सहानी वि.वि. पंकज जगासिया ५१-४८; झुबिन रजिस्ट्रार/झकील पटेल वि.वि. रॉबिन पॉल/शैलेश चौबे ८०-३३);
आरसीबीसी लेजंड्स वि.वि. आरसीबीसी ऑल स्टार ४-१ (झुबिन रजिस्ट्रार वि.वि. अनुप मल्होत्रा ६६-३२; वेदांत दोशी वि.वि. रमेश शहा १५२-१०३; पंकज सहानी वि.वि. पंकज जगासिया ४९-२३; विजय नचानी वि.वि. रॉबिन पॉल ८५-५०; मजहर ताहेरबॉय/जितेश पतोडिया पराभूत वि. चिराग मेहता/फरशीद इरानी ४९-६१);
कोरिंथियन ग्लॅडिएटर्स वि.वि. पुना क्लब मॅजिशियन्स् ३-२ (राजिव लाल वि.वि. कपिल पंजाबी १५१-१४४; विराफ बोकदावाला पराभूत वि. विग्नेश संघवी १८-६२; झुबिर शेख/विनीत पारकेरीया वि.वि. अंगद सहानी/अनिल काकडे ६२-४९; सिध्दार्थ वर्मा पराभूत वि. दिनेश मेहतानी ३५-४७; रजत फरसवाल वि.वि. सुरज राठी ७३-२९);
पुना क्लब मॅजिशियन्स् वि.वि. कोरिंथियन ग्लॅडिएटर्स ३-२ (सुरज राठी वि.वि. विनीत पारकेरीया ८६-६७; दिनेश मेहतानी पराभूत वि. विराफ बोकदावाला ३१-४३; विग्नेश संघवी वि.वि. सिध्दार्थ वर्मा ४१-३२; अनिल काकडे/अंगद सहानी पराभूत वि. रजत फरसवाल/झुबिर शेख ७२-७९; कपिल पंजाबी वि.वि. राजीव लाल १५० (४२) -१४१);
Comments
Post a Comment