आत्मनिर्भर भारताच्या दिशेने स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि जेएसडब्ल्यू यांच्यात महत्त्वपूर्ण भागीदारी


Greetings

 

COEP Technological University (COEP Tech), Pune, and JSW Projects, a JSW Group company, today signed a Memorandum of Understanding (MOU) to establish an Advanced Battery Research & Development Centre at COEP Tech's Chikhali Research Park. The Centre marks India's first indigenous battery prototyping and pilot-scale R&D platform, bringing lithium-ion cell technology development onto an academic campus in Pune for 

 

 

 

                                                                                                                                           

 

                  

 

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि जेएसडब्ल्यू यांच्यात महत्त्वपूर्ण भागीदारी

 

सीओईपीच्या चिखली रिसर्च पार्कमध्ये भारतातील पहिले स्वदेशी बॅटरी प्रोटोटायपिंग आणि पायलट-स्केल संशोधन आणि विकास केंद्र उभारणार; आठशे कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक

 

पुणेः- सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या चिखली रिसर्च पार्कमध्ये अत्याधुनिक स्वदेशी बॅटरी तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्यासंदर्भात सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ आणि जेएसडब्ल्यू ग्रुप कंपनीमधील जेएसडब्ल्यू प्रोजेक्टस् यांच्यात महत्त्वपूर्ण भागीदारी करण्यात येणार आहे. याविषयीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून या केंद्राच्या माध्यमातून भारतातील पहिले स्वदेशी बॅटरी प्रोटोटायपिंग आणि पायलट-स्केल संशोधन आणि विकास केंद्र उभारले जाणार आहे. आठशे कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक असलेल्या आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेला बळकटी देणाऱ्या या केंद्राच्या माध्यमातून पुण्यातील शैक्षणिक परिसरात प्रथमच लिथियम-आयन सेल तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना मिळणार आहे.

 

या सहकार्यामुळे भारतातील बॅटरी-तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी पोहोचण्याची क्षमता सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठासह महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली असून, बॅटरी परिसंस्थेशी संबंधित एक हजारांहून अधिक रोजगारनिर्मितीला चालना मिळणे अपेक्षित आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहने, ग्रिड स्टोरेज आणि स्वच्छ ऊर्जेच्या भवितव्याला आधार मिळणार असून हे सहकार्य २०७० पर्यंतचे 'शून्य कार्बन उत्सर्जन'चे उद्दिष्ट साध्य करण्याच्या महत्त्वाकांक्षेला बळ देणार आहे.

 

या सामंजस्य करारावर सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्यावतीने कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे आणि जेएसडब्ल्यू ग्रुप ऑफ कंपनीजच्या वतीने कार्यकारी उपाध्यक्ष नरेश ललवाणी यांनी स्वाक्षरी केली. या प्रसंगी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरुड, आरआयआयएल (रील)चे संचालक डॉ. एस. पी. महाजन, अधिष्ठाता प्रा. पी. ए. सदगीर, 'फॅकइंज'चे संस्थापक आणि विप्रो पारीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रणजीत दाते, प्रोफेसर-ऑफ-प्रॅक्टिस डॉ. सारिका केळकर, विशेष कर्तव्य अधिकारी डॉ. अविनाश जोशी आणि प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस मंदार भाटवडेकर उपस्थित होते. तर जेएसडब्ल्यू ग्रुप ऑफ कंपनीजचे प्रतिनिधित्व वरिष्ठ उपाध्यक्ष अमिताभ सिंग, सहयोगी उपाध्यक्ष चंद्रकांत महालिंगम्, उपमहाव्यवस्थापक विजय चौधरी आणि उपमहाव्यवस्थापक सुदीप सरकार यांनी केले.

 

यावेळी बोलताना सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुनील भिरुड म्हणाले की, आयात करण्यात येणाऱ्या बॅटऱ्यांना सक्षम स्वदेशी पर्याय विकसित करण्याची आणि भारताच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासात महत्त्वपूर्ण योगदान देण्याची क्षमता या सहयोगी प्रकल्पामध्ये आहे. विद्यार्थ्यांना अत्याधुनिक बॅटरी तंत्रज्ञान शिकण्याची आणि या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करण्याची अनोखी संधी या माध्यमातून मिळणार आहे. देशभरात भावी पिढीतील बॅटरी तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू असताना, या भागीदारीमुळे संशोधन, नवोन्मेष आणि तंत्रज्ञान विकासाला अधिक व्यापक व्यासपीठ मिळणार आहे. या उपक्रमाची व्याप्ती लक्षणीय असून भारतातील बॅटरी तंत्रज्ञान परिसंस्था अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या भविष्यवेधी उपक्रमाला महाराष्ट्र शासन आणि सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे संचालक मंडळ यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल आम्ही आभारी आहोत.

 

यासंदर्भात बोलताना जेएसडब्ल्यू ग्रुपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल म्हणाले की, सेल हे या शतकातील नवीन इंधन असून ज्याप्रमाणे खनिज तेलाने मागील शतकाला ऊर्जा दिली, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक वाहनांपासून ग्रिडपर्यंतच्या सर्वच साधनांना या शतकामध्ये ऊर्जा देण्याचे काम बॅटरी सेल करणार आहेत. अनेक दशकांपासून भारताने खनिज तेलाच्या आयातीसाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च केले आहे. आता नव्या भारतासाठी अत्याधुनिक कौशल्ये आणि क्षमता विकसित करून हे सेल भारतातच तयार करण्याची वेळ आली आहे. १७२

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*