कर्णकर्कश्य आवाजाबाबतची फडणवीस यांची भूमिका शहामृगी पद्धतीची.*: मुकुंद किर्दत, आप
*कर्णकर्कश्य आवाजाबाबतची फडणवीस यांची भूमिका शहामृगी पद्धतीची.*: मुकुंद किर्दत, आप
पुणेकरांच्या मानसिक, शारीरिक त्रासाकडे दुर्लक्ष करीत यांचेही चालू द्या त्यांचेही चालू द्या अशा पद्धतीची देवेंद्र फडणवीस यांची कर्णकर्कश डीजे संदर्भातली शहामृगी भूमिका असल्याची टीका आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
काल पुण्यामध्ये एका कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणेकरांनी या वादात न पडता सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असा सल्ला दिला. पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन पिटीशन, इमेल तसंच रस्त्यावर मोर्चा आणि आंदोलन करीत डीजे विरोधात आपली भूमिका मांडली आहे.
खरे तर या संदर्भात आवाजाच्या तीव्रतेबाबत कायद्यामध्ये स्पष्टता असून त्याची अंमलबजावणी अनेक वर्ष होत नाही हे उघड झालेले आहे.
मागील वर्षी इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या सर्वे मध्ये मिरवणुकीत प्रत्यक्षात 110 डेसिबल च्या जवळपास आवाजाची तीव्रता होती असे आढळून आलेले आहे. रहिवासी क्षेत्रामध्ये दिवसा 55 डेसिबल ही मर्यादा असताना एवढ्या मोठ्या तीव्र आवाजामुळे कायमचे कानाचे आजार होऊ शकतात असे अनेक डॉक्टरांनी सांगितलेले आहे. तसेच हृदयविकार असलेले जेष्ठ लहान बालके, रस्त्यावरील पुणेकर आणि पाळीव प्राणी या सर्वांनाच आवाजामुळे त्रास होतो.
यामुळे पुणेकरांच्या याविषयीच्या भावना तीव्र असून गणेशोत्सवच नव्हे तर सर्वच धार्मिक आणि राजकीय ,सामाजिक कार्यक्रम मिरवणुकीमध्ये ही आवाजाची मर्यादा पाळली जाणे अत्यंत गरजेचे आहे असे पुणेकर वेळोवेळी स्पष्ट करीत आहेत.
या दोन्ही प्रदूषण कायद्याची अत्यंत कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे असे आम आदमी पार्टीचे म्हणणे आहे.
पुण्यामध्ये महापौर या त्यांच्या कार्यकर्त्यांना त्रास होऊ देणार नाही असे म्हणत आहेत, तर त्यांचेच नेते हे गणेशोत्सवात कोणतेही निर्बंध नकोत असे विधान करीत आहेत. अशा वेळेस ज्यांच्यावर या कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी आहे त्याच मुख्यमंत्र्यांनी असे विधान करणे हे चुकीचे असून यांचेही चालू द्या , तुमचेही चालू द्या अशी, पुणेकरांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करणारी ही शहामृगी वृत्ती आहे अशी टीका आम आदमी पार्टी चे मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
आम आदमी पार्टी, महाराष्ट्र
Comments
Post a Comment