राघवेंद्र बाप्पु मानकर मेडिकल फाऊंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीत आपत्कालीन मदतीसाठी रुग्णवाहिका सज्ज!
पुण्याच्या गणेशोत्सवाची सांगता उद्या गणेश विसर्जन मिरवणुकीने होत आहे. या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीत आपत्कालीन मदतीसाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव निर्विघ्नपणे संपन्न व्हावा, गर्दीत नागरिकांना कोणतीही तातडीच्या मदतीची गरज पडल्यास रुग्णवाहिका उपलब्ध व्हाव्यात यासाठी हा उपक्रम राबविण्यात असल्याचे नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी सांगितले.
राघवेंद्र बाप्पु मानकर मेडिकल फाऊंडेशनच्या माध्यमातून मुख्य मिरवणूक मार्गावर नुमवी प्रशाला (बाजीराव रस्ता), एसपी कॉलेज चौक (टिळक रस्ता), ओंकारेश्वर मंदिर (शनिवार पेठ), शर्मिली चौक(कुमठेकर रस्ता), आझाद मित्रा मंडळ (लक्ष्मी रस्ता) येथे रुग्णवाहिका उपलब्ध असणार आहेत.
रुग्णवाहिका उपलब्ध असलेली ठिकाणे व संपर्क क्रमांक:
- नूमवि प्रशाला बाजीराव रोड- 7888008856 (आशुतोष)
- एस पी कॉलेज गेट, टिळक रोड- 7666073800 (अनिल)
- ओंकारेश्वर मंदिर चौक, शनिवार पेठ- 8806774937 (रेहान)
- शर्मिली चौक, कुमठेकर रोड, विश्रामबागवाड्याजवळ- 9158301816 (गणेश)
- आझाद मित्र मंडळ, कुलकर्णी पेट्रोल पंप च्या शेजारी लक्ष्मी रोड- 7666658552 (अरबाज)
Comments
Post a Comment