अभिनवमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा* *विदयार्थ्यांनी बनवल्या सुबक गणेश मूर्ती*
*अभिनवमध्ये पर्यावरणपूरक गणेश मूर्ती कार्यशाळा*
*विदयार्थ्यांनी बनवल्या सुबक गणेश मूर्ती*
पर्यावरण रक्षण हि काळाची गरज ओळखून प्रत्येकाने आपापल्या परीने पर्यावरण रक्षण करणे अत्यंत गरजेचे असल्याने गणपती उत्सवामध्ये विघ्नहर्ता गणेश हा सुद्धा पर्यावरपूरक असावा हीच संकल्पना लक्षात घेऊन आंबेगाव बुद्रुक येथील अभिनव एज्यूकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडीयम स्कूल आणि जुनिअर कॉलेजमध्ये गणपती उत्सवानिमित्त इको फ्रेंडली गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली.यावेळी शाळेच्या एस एस सी विभागाच्या आणि सी बी एस ई विभागाच्या इयत्ता ५ वी ते इयत्ता ९ वी च्या विद्यार्थ्यांनी जवळजवळ ३८९ सुबक मूर्ती साकार केल्या.आणि त्या मूर्तीवर अथक परिश्रमाने पर्यावरण पूरक रंग चढवले. मूर्ती घडवताना आणि रंग चढवताना विद्यार्थ्यांचे सृजनत्व थक्क करणारे होते .
पर्यावरपूरक मूर्ती बनवल्या तर बाप्पांच्या मूर्तीचे विसर्जनानंतर विघटन होईल त्यामुळे पर्यावरणाला हानीही पोहोचणार नाही असा विचार संस्थापक राजीव जगताप यांनी व्यक्त केला.
या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शैलेंद्र सोनाये, सई दुर्गावळे, सुरेश उदमले, सुरज सुभेदार, या कला शिक्षकांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव जगताप , उपाध्यक्ष संजीव जगताप,सेक्रेटरी सुनीता जगताप , खजिनदार ध्रुव जगताप,सहसेक्रेटरी निर्मोही जगताप ,प्राचार्या वर्षा शर्मा यांनी कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या आणि कार्यशाळेसाठी सहकार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले
Comments
Post a Comment