डेक्कन जिमखाना येथील पुलाची वाडीमधील शिवराज तरुण मंडळ ट्रस्ट या मंडळाने यंदाच्या वर्षी हरिश्चंद्र गडावरील केदारेश्वर गुहा हा आकर्षक

डेक्कन जिमखाना येथील पुलाची वाडीमधील शिवराज तरुण मंडळ ट्रस्ट या मंडळाने यंदाच्या वर्षी हरिश्चंद्र गडावरील केदारेश्वर गुहा हा आकर्षक देखावा सादर केला आहे. या गुहेत आकर्षक पद्धतीने शिवलिंग (पिंड ) तयार करण्यात आले आहे. देखावा पहिल्याच दिवशी नागरिकांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे. देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होतं आहे. नागरिक भक्तीभावाने शिवलिंगाचे दर्शन घेत असतात. या देखाव्याची कल्पना मंडळाच्या कार्यकर्त्यांची आहे. नंदकुमार बुदर यांनी हा देखावा हुबेहूब सादर केला आहे. मंडळाचे अध्यक्ष मनोज बांदल व विशाल गांदले कार्याध्यक्ष आहेत. मंडळातर्फे वर्षभर सार्वजनिक वाचनालय हा उपक्रम 40 वर्षांहून अधिक काळ चालवीला जात आहे. रक्तदान शिबीर, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, नेत्रचिकित्सा शिबिर, पूरग्रस्तांना सर्वोतपरी मदत आदी उपक्रम राबविण्यात येतात.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*