भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी माथाडी संघटन महामेळाव्याचे उद्घाटन - अनुप मोरे
भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी माथाडी संघटन महामेळाव्याचे उद्घाटन - अनुप मोरे
पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे मंगळवारी आयोजन - आमदार उमा खापरे
पिंपरी, पुणे (दि. २७ सप्टेंबर २०२६) भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियन (रजि.) या संस्थेचा राज्यस्तरीय महामेळावा मंगळवारी (दि. २९) दुपारी दोन वाजता, चिंचवड, ऑटो क्लस्टर येथे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियन (रजि.) संस्थापक अध्यक्ष अनुप अविनाश मोरे यांनी रविवारी पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार उमा खापरे, माजी उप महापौर व ज्येष्ठ नगरसेवक तुषार हिंगे, युनियन प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे, पुणे जिल्हा अध्यक्ष अक्षय वरघडे, प्रदेश सरचिटणीस संतोष कांबळे, भाजपा मंडल अध्यक्ष जयदीप खापरे, युनियन शहर उपाध्यक्ष इम्रान पानसरे, चंदन सिंग, किरण पनाले आदी उपस्थित होते.
यावेळी अनुप मोरे यांनी सांगितले की, भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट आणि सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियन (रजि.) या संस्थेच्या राज्यस्तरीय महामेळाव्याचे आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. यावेळी रवींद्र चव्हाण हे मुख्य मार्गदर्शन करणार आहेत. सन २०३० पर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात ३० हजार पदाधिकारी जोडण्याच्या संकल्प करण्यात येणार आहे. तसेच संस्थेच्या उद्दिष्टावर विचारविनिमय होईल. यामध्ये १४ जिल्ह्यांतील ६ हजारांहून अधिक माथाडी पदाधिकारी सहभागी होणार आहेत अशी अनुप अविनाश मोरे यांनी दिली.
या मेळाव्यात कामगारांचा रोजगार, सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा आणि कल्याण संबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन, माथाडी संघटना अधिक बळकट करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, कामगारांच्या समस्या प्रभावीपणे सोडविण्यासाठी आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विचारविनिमय होणार आहे.
त्याचबरोबर ऑटो क्लस्टर येथील दुसऱ्या सभागृहामध्ये सकाळी ९ वाजता, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. अनुप मोरे सोशल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन, आरंभ सोशल फाऊंडेशन आणि टीम पिंपरी चिंचवड, ‘युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रा. लि.’ यांच्या सहकार्याने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आमदार उमा खापरे यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या महाकुंभात पिंपरी चिंचवड परिसरातील उद्योग क्षेत्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, पात्र उमेदवारांना ऑन द स्पॉट नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे अशी माहिती आमदार उमा खापरे यांनी यावेळी दिली.
पाचवी पास पासून उच्चशिक्षित उमेदवारांपर्यंत सर्व पात्र युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हा महामेळावा होईल. या महाकुंभामध्ये बँकिंग, आयटी, आयटीआय, बीपीओ, केपीओ, रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, ऑटोमोबाईल आणि टेक्नॉलॉजी यांसारख्या विविध अग्रगण्य क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत अशी माहिती माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक तुषार हिंगे यांनी दिली.
या महाकुंभ मेळाव्यात ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, हुडास टेक्नॉलॉजी, विगल स्पेस, बजाज, हुंडाई यासारख्या नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे. ५ वी ते १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, इंजिनिअरिंग तसेच इतर सर्व पात्र उमेदवारांना त्यांच्या कौशल्यानुसार नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मेळाव्यात सहभागी झालेल्या परंतु तात्काळ नोकरी न मिळालेल्या उमेदवारांसाठी आयोजकांच्या वतीने एक नाविन्यपूर्ण ‘जॉब कार्ड’ उपक्रम राबविला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपल्या आवश्यक कागदपत्रांसह व अपडेटेड बायोडाटासह मंगळवारी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने जयदीप खापरे यांनी
Comments
Post a Comment