सामाजिक बांधिलकी जपत भारतीय टपाल विभागाचा गणेशोत्सवात सक्रिय सहभाग.भारतीय टपाल विभागाचा गणेशोत्सवात सामाजिक व जनसेवेचा कौतुकास्पद पुढाकार



सामाजिक बांधिलकी जपत भारतीय टपाल विभागाचा गणेशोत्सवात सक्रिय सहभाग.

भारतीय टपाल विभागाचा गणेशोत्सवात सामाजिक व जनसेवेचा कौतुकास्पद पुढाकार

पुणेः

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट तर्फे पुणे शहर मुख्य टपाल कार्यालय परिसरात

तातडीच्या वैद्यकीय सेवेचे आयोजन

गणेशोत्सव काळात पुणेकरांच्या व भाविकांच्या सेवेसाठी 'नाईट कॅम्प पोस्ट ऑफिस' आणि पोलीस

दलासाठी विशेष सुविधा

पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय टपाल विभागाने विविध लोकोपयोगी व सामाजिक उपक्रमांद्वारे आपले योगदान दिले आहे. "डाक सेवा, जन सेवा" या मूलमंत्राला अनुसरून भारतीय टपाल विभागातर्फे गणेश भक्तांसाठी आणि पुणेकरांसाठी आरोग्य सेवा, विशेष टपाल सुविधा व पोलीस दलासाठी विश्रांतीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१. मोफत वैद्यकीय शिबीरः

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे आयोजित वैद्यकीय शिबिरासाठी पुणे सिटी पोस्ट ऑफिसच्या परिसरातील सुमारे ५०० चौरस फूट जागा भारतीय टपाल विभागाने उपलब्ध करून दिली आहे.

उद्घाटनः या वैद्यकीय सेवेचे उद्घाटन रविवारी, दिनांक १३.०९.२०२६ रोजी श्रीमती प्रीती अग्रवाल

(पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र) यांच्या हस्ते संपन्न झाले.

उपस्थित मान्यवरः या प्रसंगी मा. सुनील रासने, अध्यक्ष, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेश

मंडळ, श्री. महेश सूर्यवंशी, खजीनदार, प्रवर अधीक्षक श्री. नितीन येवला, श्री. विलास घुले, प्रवर डाकपाल आणि टपाल विभागाचे इतर कर्मचारी उपस्थित होते.

२. 'नाईट कॅम्प पोस्ट ऑफिस' सुविधाः

गणेशोत्सव काळात नागरिकांच्या सुविधेसाठी पुणे शहर प्रधान डाकघर येथे विशेष 'नाईट कॅम्प पोस्ट ऑफिस'

सुरू करण्यात येत आहे.

कालावधीः १५.०९.२०२६ ते २५.०९.२०२६

वेळ: सायंकाळी ०७:३० ते रात्री ११:३० वाजेपर्यंत

उपलब्ध सुविधाः टपाल विभागाच्या विविध बचत योजना, पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI), 'माय

स्टॅम्प', आधार कार्ड संबंधित सर्व सेवा आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या (IPPB) विमा व इतर

सुविधांचा लाभ नागरिकांना घेता येईल.

३. पुणे शहर पोलीस दलासाठी विशेष सोयः

गणेशोत्सव काळात दिवस-रात्र कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पुणे शहर पोलीस दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विश्रांती आणि भोजनासाठी पुणे शहर प्रधान डाक घराचे पूर्ण प्रांगण, आरामगृह आणि बाथरूमची सोय संपूर्ण उत्सव कालावधीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मान्यवरांचे मनोगतः

"गणेशोत्सवाच्या या पावन काळात नागरिकांना आणि भाविकांना आवश्यक वैद्यकीय सेवा व टपाल सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, हाच टपाल विभागाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी या सर्व सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा."

श्रीमती प्रीती अग्रवाल, पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने भारतीय टपाल विभागाला जनसेवेची ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विभागाच्या वतीने ट्रस्टचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. या सामाजिक उपक्रमांबद्दल श्रीमती प्रीती अग्रवाल आणि निदेशक श्री. अभिजित बनसोडे यांनी पुणे शहर प्रधान डाकघर व पुणे शहर पश्चिम विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले.

Smart Actions found 3 useful actions

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*