रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्यावतीने पदाधिकारी व समाज बांधवांची बैठक संपन्न



रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्यावतीने पदाधिकारी व समाज बांधवांची बैठक संपन्न 


रिपब्लिकन चर्मकार महासंघाच्या वतीने पुना स्टेशन येथे महासंघाच्या कार्यालय मध्ये पदाधिकारी व समाज बांधवांची विविध प्रश्नांसाठी महत्त्वाच्या विषयांवर बैठक संपन्न झाली या चर्मकार समाजाला हक्काचं घर मिळण्याबाबत गटई कामगारांना स्टॉल मिळण्याबाबत चर्मकार समाजातील बेरोजगार मुला मुलींना संत रोहिदास चर्म उद्योग महामंडळामध्ये कर्ज उपलब्ध व्हावी. संघटना वाढवण्यास पदाधिकाऱ्यांची शहर जिल्हा पातळीवर नियुक्ती करण्याबाबत.संत रोहिदास महाराज यांचा पुतळा पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात उभारण्यात यावी व समाजामध्ये वधु वर परिचय मेळावा अशा विविध विषयांवर बैठक संपन्न झाली.
 या बैठकीला रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड यांनी उपस्थित कार्यकर्ते समाज बांधवांना मार्गदर्शन केले. 
यावेळी महिला प्रदेश कार्याध्यक्ष सारिका कांबळे, राज्य कार्याध्यक्ष रमेश बडगे, खजिनदार सुनील राठी,पुणे जिल्हाध्यक्ष महेंद्र एरल्लू, महिला जिल्हाध्यक्षा उमा वाडेकर, पुणे शहर महिला अध्यक्षा शशिकला ढवळे,पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रभू उदपुरे, जिल्हा युवा अध्यक्ष मयूर पोटे, विजय वरछाये, हरिभाऊ हवणे, गटई कामगार जिल्हाध्यक्ष सुनील चराटे, रवींद्र शिराळे, छाया मराठे, कमलताई उनवणे, रोहिणी उदमले, आदि उपस्थित होते. याप्रसंगी समाजातील विविध मान्यवरांचा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजू भाऊ बनसोड त्यांचा सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*