टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसच्या ‘एसएमई डिजिटल इन्साइट्स’ अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार सायबर सुरक्षा गुंतवणुकीत पश्चिम भारत देशात अग्रेसर
Description automatically generated
टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसच्या ‘एसएमई डिजिटल इन्साइट्स’ अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार सायबर सुरक्षा गुंतवणुकीत पश्चिम भारत देशात अग्रेसर
सायबर सुरक्षा गुंतवणुकीच्या बाबतीत पश्चिम भारत आघाडीवर; या भागातील ५६% लघु, मध्यम उद्योजक त्यांच्या वार्षिक महसुलातील ६–१०% हिस्सा माहिती तंत्रज्ञानावर आणि या बजेटमधील ४५% हिस्सा विशेषतः सायबर सुरक्षेवर करत आहेत खर्च.
पश्चिम भारतातील ५५% लघु, मध्यम उद्योजक त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या व्यवस्थापनासाठी विशेषज्ञ तंत्रज्ञान प्रदात्यांना देतात प्राधान्य.
येत्या वर्षभरात पश्चिम भारतातील ५१% एसएमई देखरेख आणि ४५% अनुपालन मजबूत करण्याची योजना आखत आहेत.
मुंबई, २३ सप्टेंबर २०२६: टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस (TTBS) आणि सायबरमीडिया रिसर्च (CMR) यांनी मिळून केलेल्या 'एसएमई डिजिटल इन्साइट्स २०२६: सायबरसिक्युरिटी' या ताज्या अभ्यासानुसार, पश्चिम भारत हा देशात सायबर सुरक्षेवरील गुंतवणुकीत एक प्रमुख बाजारपेठ म्हणून समोर येत आहे. या भागातील लघु आणि मध्यम उद्योग तंत्रज्ञानावरील आपल्या मोठ्या खर्चाचा वापर आता नेटवर्कची देखरेख, प्रशासन आणि तज्ञांच्या मार्गदर्शनासाठी करत आहेत.
पश्चिम भारतातील ५६% लघु आणि मध्यम उद्योग आता त्यांच्या वार्षिक उत्पन्नाचा ६ ते १०% हिस्सा माहिती तंत्रज्ञानावर खर्च करत आहेत. विशेष म्हणजे, या बजेटमधील ४५% हिस्सा कंपन्या केवळ सायबर सुरक्षेसाठी बाजूला ठेवत आहेत. देशातील इतर कोणत्याही क्षेत्राच्या तुलनेत सुरक्षेसाठीची ही सर्वात मोठी कटिबद्धता आहे. ही मजबूत आर्थिक गुंतवणूक या क्षेत्राला भविष्यात सायबर हल्ल्यांविरोधात अधिक सुरक्षित आणि सक्षम बनवण्यास मदत करत आहे.
या अभ्यासात असेही समोर आले आहे की, पश्चिम भारतातील ५५% लघु आणि मध्यम उद्योजक त्यांच्या सुरक्षिततेचे व्यवस्थापन करण्यासाठी बाहेरील विशेषज्ञ तंत्रज्ञान भागीदारांसोबत काम करण्यास प्राधान्य देतात. याशिवाय, येत्या वर्षात ५१% कंपन्यांनी आपली सुरक्षा देखरेख आणि ४५% कंपन्यांनी नियमांचे पालन अधिक मजबूत करण्याचे ठरवले आहे. हा अभ्यास अधोरेखित करतो की, प्रभावी सायबर सुरक्षा लागू करताना 'तज्ञ कौशल्यांची कमतरता' ही कंपन्यांसमोरील सर्वात मोठी अडचण आहे (सुमारे ४५% एसएमईंनी ही अडचण बोलून दाखवली). म्हणूनच तज्ञांची मदत घेण्याची पश्चिम भारताची (५५%) तयारी ही सुरक्षिततेतील ही त्रुटी वेगाने भरून काढण्यासाठी योग्य पाऊल ठरत आहे.
Mannu Singh टाटा टेलिसर्व्हिसेसचे व्हाइस प्रेसिडेंट मन्नू सिंह या निष्कर्षांवर बोलताना म्हणाले, "पश्चिम भारतातील लघु आणि मध्यम उद्योग आपले व्यवसाय सुरक्षित आणि डिजिटल बनवण्यासाठी अत्यंत गंभीर आहेत. आमच्या अभ्यासाचे निष्कर्ष अतिशय उत्साहवर्धक आहेत; कारण ते दाखवतात की कंपन्या केवळ तंत्रज्ञानावर पैसे खर्च करत नसून कामकाजातील शिस्तीलाही महत्त्व देत आहेत. व्यवसाय डिजिटल होत असताना, सायबर सुरक्षेला रोजच्या कामकाजाचा अनिवार्य भाग बनवण्याची ही उत्तम संधी आहे. 'टीटीबीएस'मध्ये आमचे उद्दिष्ट या कंपन्यांना मदत करणे आहे, जेणेकरून ते या गतीचा फायदा घेऊन अधिक सुरक्षितता, मजबूती आणि नवीन आत्मविश्वासाने प्रगतीच्या पुढच्या टप्प्यात पाऊल टाकू शकतील. 'सायबरमीडिया रिसर्च'सोबत मिळून आम्ही कंपन्यांच्या सद्यस्थितीचा अभ्यास करत आहोत, जेणेकरून त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यावहारिक आणि ठोस पावले उचलण्यास मदत होईल."
Comments
Post a Comment