सहावी ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा !!गट्स अँड ग्लोरी, ब्रेव्हहार्ट क्लब, सेरेन स्ट्रायकर्स संघांची विजयी आगेकूच !!


सहावी ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा !!

गट्स अँड ग्लोरी, ब्रेव्हहार्ट क्लब, सेरेन स्ट्रायकर्स संघांची विजयी आगेकूच !!

पुणे, ९ सप्टेंबरः स्पार्टन क्रिकेट क्लब पुणे तर्फे आयोजित सहाव्या ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’ अजिंक्यपद मिक्स कॉर्पोरेट टी-२० क्रिकेट स्पर्धेत गट्स अँड ग्लोरी, ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लब आणि सेरेन स्ट्रायकर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी कामगिरी केली.

सिंहगड रोडवरील कोद्रे फार्मस्‌ क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कौशल असबे याने फटकावलेल्या ७६ धावांच्या जोरावर गट्स अँड ग्लोरी संघाने रियुनायटेड क्रिकेट क्लबचा १०९ धावांनी सहज पराभव केला. गट्स अँड ग्लोरी संघाने १९४ धावांचे लक्ष्य उभे केले होते. रियुनायटेडच्या करण जगताप याने ३९ धावांत पाच गडी बाद केले. त्याला उत्तर देताना रियुनायटेड क्रिकेट क्लबचा डाव ८५ धावांमध्ये संपुष्टात आला.

दुसऱ्या सामन्यात चित्तरंजन रे याने फटकावलेल्या १४५ धावांच्या जोरावर ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबने जीएसके क्रिकेट क्लबचा २९२ धावांनी एकतर्फी पराभव केला. चित्तरंजन रे ५२ चेंडूत ११ चौकार व १४ षटकारांसह १४५ धावांची खेळी केली. या जोरावर ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबने ३०९ धावांचा डोंगर रचला. चेतन खोपडे (नाबाद ७७ धावा) आणि जय ढोले (नाबाद ५० धावा) यांनीही अर्धशतकी खेळी करून संघाचा डाव उभा केला. याला उत्तर देताना जीएसके क्रिकेट क्लबचा डाव ११७ धावांवर संपुष्टात आला. गणेश नागवणे याने केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर सेरेन स्ट्रायकर्सने सुशिल जाधव स्पोर्ट्‌स फाऊंडेशन (एसजेएसएफ) मेन्स्‌ संघाचा सात गडी राखू सहज पराभव केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
गट्स अँड ग्लोरीः १९.२ षटकात १० गडी बाद १९४ धावा (कौशल असबे ७६ (४२, ४ चौकार, ६ षटकार), विशाल गुप्ता ३२, निनाद फाटक २१, करण जगताप ५-३९, राहूल नाईक २-३२, निखील कदम २-३६) वि.वि. रियुनायटेड क्रिकेट क्लबः १४.१ षटकात १० गडी बाद ८५ धावा (अनिश हरसुळे ३५, कौशल असबे ३-१९, मिहीर ओक २-१५, कृष्णा भट २-१४); सामनावीरः कौशल असबे;

ब्रेव्हहार्ट कॉर्पोरेट क्रिकेट क्लबः २० षटकात २ गडी बाद ३०९ धावा (चित्तरंजन रे १४५ (५२, ११ चौकार, १४ षटकार), चेतन खोपडे नाबाद ७७ (२५, ७ चौकार, ६ षटकार), जय ढोले नाबाद ५०, वैभव लवांडे ३२) वि.वि. जीएसके क्रिकेट क्लबः २० षटकात ८ गडी बाद ११७ धावा (शैलेश अमडेकर नाबाद २२, राज कुमार नाबाद २१, संजय यादव ३-१४, विजयकुमार शेट्टी २-२५); सामनावीरः चित्तरंजन रे;

सुशिल जाधव स्पोर्ट्‌स फाऊंडेशन (एसजेएसएफ) मेन्स्‌ः १८.२ षटकात १० गडी बाद १५९ धावा (सुशिल जाधव २८, शुभम तिवारी २६, गणेश नागवणे ४-२५, अफरोज शेख ३-४१, गौरव राठोड २-१६) पराभूत वि. सेरेन स्ट्रायकर्सः १५.४ षटकात ३ गडी बाद १६१ धावा (सौरभ जळगांवकर ७० (३०, ६ चौकार, ६ षटकार), जय कुमार ४१, शुभम कोद्रे २१); सामनावीरः गणेश नागवणे.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*