क्लिअरट्रिपचा हॉलिडे पॅकेजेस क्षेत्रात प्रवेश, प्रवासी स्वतः बदल करू शकतील अशा विशेष पॅकेजेसची सुविधा


क्लिअरट्रिपचा हॉलिडे पॅकेजेस क्षेत्रात प्रवेश, प्रवासी स्वतः बदल करू शकतील अशा विशेष पॅकेजेसची सुविधा

राष्ट्रीय, सप्टेंबर २८, २०२६: क्लिअरट्रिप या फ्लिपकार्टची कंपनी आणि भारतातील अग्रगण्य ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मने आज हॉलिडे पॅकेजेस श्रेणीत प्रवेश केल्याची घोषणा केली. यामुळे फ्लाइट्स, हॉटेल्स, क्रियाकलाप आणि ट्रान्सफर्स हे सर्व तज्ज्ञांनी तयार केलेल्या एकाच विशेष पॅकेजमध्ये उपलब्ध होणार आहे. तसेच प्रवासी त्यांच्या आवडीनुसार त्यात बदल करू शकतात.

हे लाँच क्लिअरट्रिपच्या परिपूर्ण आणि मल्टीमॉडल ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मच्या रूपात विकसित होण्याच्या व्यापक विकास धोरणाचा भाग आहे. केवळ वैयक्तिक प्रवास बूकिंगच्या पलीकडे जाऊन प्रवाशांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन आणि अनुभव घेण्यासाठी अधिक सुलभ व एकमेकांशी जोडलेला पर्याय देणे, हा यामागील उद्देश आहे.

बहुतेक हॉलिडे पॅकेजेस आधीच ठरवलेले प्लॅन देतात आणि त्यानुसार स्वतःचे नियोजन करण्यास सांगतात. क्लिअरट्रिप हॉलिडे पॅकेजेस याउलट सुविधा देतात. प्रवासी तज्ज्ञांनी तयार केलेल्या आराखड्यापासून सुरुवात करू शकतात आणि पॅकेजच्या मूळ स्वरूपात बदल न करता हॉटेल बदलणे, नियोजनामध्ये बदल करणे किंवा विमानाचे वेळापत्रक बदलणे यांसारखे निर्णय स्वतःच्या गरजेनुसार घेऊ शकतात, ज्यामुळे पॅकेज बुक करण्याचा खरा उद्देश कायम राहतो.

क्लिअरट्रिपचे एअर विभागाचे चीफ बिझनेस ऑफिसर गौरव पटवारी म्हणाले, “भारतात सुट्ट्यांचे नियोजन करणे नेहमी आव्हानात्मक राहिले आहे. तुम्हाला एक ठरवून दिलेले पॅकेज स्वीकारावे लागते किंवा स्वतः नियोजन करण्यात वेळ घालवावा लागतो. आम्हाला वाटते की, यासाठी अधिक चांगला पर्याय असू शकतो. तज्ज्ञांनी तयार केलेले, प्रवाशांच्या पूर्ण नियंत्रणात असलेले आणि गरज पडल्यास मदतीसाठी तज्ज्ञ उपलब्ध असणारे हे नियोजन आहे. आज आम्ही सर्व लोकप्रिय पर्यटन स्थळांसाठी हीच सुविधा सुरू केली आहे आणि यामुळे भारतातील प्रवाशांच्या पुढील प्रवासाचे नियोजन करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून जाईल.”

ही ऑफरिंग हॉलिडेचे नियोजन करण्यामध्ये मानवी साह्य देखील देते. पर्यटक प्रवासाचे नियोजन करताना मार्गदर्शनासाठी तज्ज्ञांशी बोलू शकतात, ज्यामुळे त्यांना पर्यटन स्थळांची निवड करणे, प्रवासाचा आराखडा तयार करणे आणि सहलीचे विविध पैलू एकत्र जुळवून आणणे सोपे जाते. सहलीचे नियोजन पूर्ण झाले की, प्रवाशांना थेट प्रवासाचा तपशील मिळतो, ज्यामध्ये ड्रायव्हरची माहिती, व्हाउचर आणि दैनंदिन नियोजन यांचा समावेश असतो, तसेच प्रवासादरम्यान त्यांना २४×७ सपोर्ट देखील मिळतो.

भारतातील अग्रगण्य ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म क्लिअरट्रिपची व्याप्ती आणि फ्लिपकार्ट ग्रुपमधील स्थान यामुळे कंपनीला फ्लाइट्स, हॉटेल्स आणि पुरवठादारांशी दर निश्चित करणे आणि इन्व्हेंटरी मिळवणे शक्य झाले आहे, जे वैयक्तिक प्रवाशांना स्वतःहून मिळवणे अशक्य असते, तसेच अद्वितीय सेवा अनुभव देखील दिला जातो. हा सर्व लाभ थेट हॉलिडे पॅकेजेसच्या माध्यमातून प्रवाशांपर्यंत पोहोचवला जातो, जो प्रत्येक नियोजनात समाविष्ट असलेल्या किमतीत, उत्कृष्ट मांडणीत आणि स्थिरतेमध्ये दिसून येतो. आणि ज्या प्रवाशांना अजूनही अधिक खात्री पाहिजे त्यांच्यासाठी क्लिअरट्रिपचे प्राइस बीट ऑफर* अगदी सोपे आहे: इतर कुठेही हाच प्रवासाचा आराखडा कमी किमतीत शोधा आणि क्लिअरट्रिप त्यापेक्षाही कमी दर देईल.

 

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*