तेलंगणात भारतातील पहिल्या सर्वसमावेशक ऑइल पाम संकुलाचे गोदरेज ॲग्रोव्हेटकडून उद्घाटन
तेलंगणात भारतातील पहिल्या सर्वसमावेशक ऑइल पाम संकुलाचे गोदरेज ॲग्रोव्हेटकडून उद्घाटन
300 कोटी रुपयांची एकत्रित गुंतवणूक; कंपनीच्या विस्तार योजनांना बळ देण्यासाठी सीड-टू-रिफाइनरी (बियाण्यापासून ते शुद्धीकरण प्रकल्प) संकुल
29 Sept. 2026 : भारतातील फार्म-टू-प्रोटिन क्षेत्रातील सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्म्सपैकी एक असलेल्या गोदरेज ॲग्रोव्हेट लिमिटेडने (Godrej Agrovet) तेलंगणातील खम्मम येथे भारतातील पहिल्या इंटिग्रेटेड ऑइल पाम कॉम्प्लेक्सचे आज उद्घाटन केले. या संकुलात ऑइल पाम मूल्य साखळीतील सर्व टप्पे – जसे की बियाणे आणि जेनेटिक्स, रोपवाटिका, संशोधन व विकास (R&D) केंद्र, मिल आणि होऊ घातलेली अत्याधुनिक रिफायनरी – एकाच छताखाली आणण्यात आले आहेत. हे संपूर्ण संकुल कार्यान्वित झाल्यावर कंपनीची एकूण गुंतवणूक 300 कोटी रुपये इतकी असेल.
तेलंगणा सरकारचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन आणि ऊर्जा मंत्री श्री. भट्टी विक्रमार्क मल्लू गारू यांच्या हस्ते या संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तेलंगणा सरकारचे महसूल व गृहनिर्माण आणि माहिती व जनसंपर्क मंत्री श्री. पोंगुलती श्रीनिवास रेड्डी गारू; कृषी, पणन, सहकार आणि हातमाग व वस्त्रोद्योग मंत्री श्री. तुम्मला नागेश्वर राव गारू; माहिती तंत्रज्ञान (ITE&C), उद्योग व वाणिज्य आणि संसदीय कामकाज मंत्री श्री. डी. श्रीधर बाबू गारू आणि खम्ममचे खासदार श्री. रामासहायम रघुराम रेड्डी गारू हे उपस्थित होते.तसेच, या कार्यक्रमाला गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे अध्यक्ष नादिर गोदरेज; गोदरेज ॲग्रोव्हेटचे नियुक्त अध्यक्ष बुर्जिस गोदरेज; गोदरेज ॲग्रोव्हेटचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कटारिया; गोदरेज ॲग्रोव्हेटच्या ऑइल पाम व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौगता नियोगी आणि गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे कॉर्पोरेट व्यवहार विभागाचे गट अध्यक्ष राकेश स्वामी हे देखील उपस्थित होते.
या प्रसंगी तेलंगणा सरकारचे माननीय उपमुख्यमंत्री आणि वित्त व नियोजन तसेच ऊर्जा मंत्री श्री. भट्टी विक्रमार्क मल्लू म्हणाले, "तेलंगणाच्या ऑइल पाम मिशनसाठी आणि राज्याला खाद्यतेलाचे प्रमुख उत्पादक बनवण्याच्या आमच्या ध्येयासाठी हे संकुल हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. तेलंगणाचे ऑइल पाम मिशन देशाची खाद्यतेल सुरक्षा बळकट करण्यासोबतच लाखो शेतकरी कुटुंबांचे जीवनमान उंचावते आहे; आणि ऑइल पाम क्षेत्रातील गोदरेज ॲग्रोव्हेटची सखोल जाण पाहता, हे ध्येय साध्य करण्यासाठी ते आमचे योग्य भागीदार आहेत. खम्मम येथे बियाण्यापासून ते रिफायनरीपर्यंतची क्षमता उपलब्ध करून देणारे हे संकुल त्या कौशल्याचे प्रतिबिंब आहे. मला खात्री आहे की, यामुळे आमच्या मोहिमेला गती मिळेल आणि ऑइल पाम उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होतील."
Comments
Post a Comment