दोनपेक्षा अधिक अपत्ये अट रद्द करण्याच्या याचिकेकडे लक्ष*सरपंच महासंघ सर्वोच्च न्यायालयात त्रयस्थ अर्जदार होणार ; इच्छुकांना आवाहन
*दोनपेक्षा अधिक अपत्ये अट रद्द करण्याच्या याचिकेकडे लक्ष*
सरपंच महासंघ सर्वोच्च न्यायालयात त्रयस्थ अर्जदार होणार ; इच्छुकांना आवाहन
पुणे :
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तींना अपात्र ठरविणाऱ्या तरतुदीविरोधात सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याला आता सरपंच महासंघाकडून पाठबळ देण्यात येणार आहे.या प्रकरणात त्रयस्थ अर्जदार (Intervenor) म्हणून सर्वोच्च न्यायालयात सहभागी होण्याचा निर्णय ग्रामगौरव फाउंडेशन कृत महाराष्ट्र ग्रामविकास परिषदेच्या सरपंच महासंघाने घेतला आहे.
सरपंच महासंघाचे संस्थापक विवेक ठाकरे यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे नमूद केले आहे की,
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलम १४(१)(जे-१) नुसार ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या उमेदवारांना अपात्र ठरविण्याची तरतुदीच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्न उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात ‘मंगला भीमराव इंगळे विरुद्ध महाराष्ट्र शासन’ अशी विशेष अनुमती याचिका क्रमांक ३०७७२/२०२५ दाखल असून
या संपूर्ण प्रकरणात सुनावणी झाली आहे.यामध्ये फक्त न्यायालयाचा निर्णय घेणे प्रलंबित आहे.राज्यातील सुमारे १५ हजार पंचायतींच्या निवडणूका तोंडावर असताना हा निर्णय लवकर व्हावा अशी कैफियत मांडत सरपंच महासंघाने सर्वोच्च न्यायालयामध्ये त्रयस्थ अर्जदार म्हणून याच याचिकेत सहभागी होण्याची तयारी पूर्ण केली आहे.
देशातील काही राज्यांमध्ये
बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या नागरिकांना निवडणूक लढविण्यापासून रोखणारी ही अट रद्द करण्यात आली असून महाराष्ट्रातही या नियमाचा पुनर्विचार व्हावा,अशी भूमिका सरपंच महासंघाने घेतली आहे.या कायदेशीर लढ्यात महाराष्ट्रातील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच तसेच या अटीमुळे निवडणुकीत सहभागी होऊ न शकणारे इच्छुक यांनी सहअर्जदार म्हणून सहभागी व्हावे त्यासाठी
सरपंच महासंघाचे संस्थापक विवेक ठाकरे यांच्याशी स्वतः ७७५८८१२०२२ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असे आवाहन त्यांनी केले आहे.
Comments
Post a Comment