मॅरिएट इंटरनॅशनल तर्फे प्रोजेक्ट प्रारंभ

मॅरिएट इंटरनॅशनल तर्फे प्रोजेक्ट प्रारंभ

पुणे,10 सप्टेंबर 2026 : मॅरिएट इंटरनॅशनल ने प्रोजेक्ट प्रारंभ हा उपक्रम सुरू केला आहे.हा उपक्रम कंपनीच्या सर्व्ह 360 या शाश्वतता आणि सामाजिक प्रभाव आराखड्याच्या मार्गदर्शनाखाली तरूणांसाठी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात औपचारिक रोजगार आणि दीर्घकालीन करिअरचे मार्ग तयार करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे.द जॉब प्लस आणि टुरिझम ॲन्ड हॉस्पिटॅलिटी स्कील कौन्सिल यांच्या सहकार्याने हा उपक्रम 18 ते 30 वयोगटातील तरूणांना उद्योगाशी संबंधित प्रशिक्षण प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देऊन त्यांना आधार देईल.यामुळे औपचारिक रोजगार क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि आत्मविश्वास विकसित करण्यास मदत होईल.प्रोजेक्ट प्रारंभची अमंलबजावणी देशभरातील प्रशिक्षण भागीदारांच्या व्यापक जाळ्याद्वारे केली जाईल. 

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*