येत्या दोन,तीन व चार ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथेअखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदे"
येत्या दोन,तीन व चार ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे
अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदे" च्या २७ व्या राष्ट्रीय वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन.
---देशभरातील २८ राज्यातील व ८ केंद्रशासित प्रदेशातील सुमारे ३५० पूर्व सैनिक प्रतिनिधी सहभागी होणार.
(प्रतिनिधी)
माजीसैनिककल्याण,राष्ट्रसेवा,समाजसेवा,संघटनात्मक विस्तार आणि आगामी काळातील विविध सामाजिक व पूर्व सैनिकांसाठी घेण्यात येणाऱ्या उपक्रमांवर व कल्याणकारी योजनांवर व्यापक विचारमंथन होणार आहे.
अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदे (ABPSSP) ची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (Annual General Meeting – AGM) दिनांक २ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत महाराष्ट्रातील पवित्र,आध्यात्मिक आणि सामाजिक कार्याच्या समृद्ध परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर येथील "श्री क्षेत्र कणेरी मठ" येथे आयोजित करण्यात आली आहे.
या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनासाठी देशाच्या विविध राज्यांतून सुमारे ३५० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.यामध्ये विविध राज्य व जिल्हा पातळीवरील पदाधिकारी,माजी सैनिक, माजी सैनिकांच्या कुटुबियांचे प्रतिनिधी तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांशी संबंधित कार्यकर्त्यांचा समावेश असेल. महाराष्ट्रातील विविध भागांतील आणि विशेषतः कोल्हापूर विभागातील माजी सैनिकांनाही या राष्ट्रीय सभेत सहभागी करून घेतले जाणार आहे.
माजी सैनिकांच्या संघटित शक्तीला राष्ट्रसेवेशी जोडण्याची प्रदीर्घ परंपरा
अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या कार्यामागे माजी सैनिकांच्या अनुभव,शिस्त,नेतृत्वगुण,कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीचा उपयोग समाज व राष्ट्राच्या व्यापक हितासाठी करण्याची संकल्पना आहे.पूर्व सैनिकांसाठी राष्ट्रसेवा आणि सामाजिक बांधिलकीचे व्यासपीठ असावे,या विचारातून १९९२ मध्ये उत्तर प्रदेशात 'पूर्व सैनिक सेवा परिषद' या संकल्पनेचा प्रारंभ झाला.या विचाराचा देशभर विस्तार होत गेला आणि नोव्हेंबर १९९५ मध्ये प्रथम अखिल भारतीय अधिवेशन आयोजित करण्यात आले.पुढे १४ सप्टेंबर १९९९ रोजी दिल्ली येथे 'अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद' या नावाने अखिल भारतीय संस्थेची औपचारिक नोंदणी करण्यात आली.
गेल्या तीन दशकांहून अधिक काळात परिषदने देशाच्या २८ राज्यात व ८ केंद्र शासित प्रदेशातील विविध भागांत आपले संघटनात्मक जाळे उभे केले असून,अनेक राज्ये व जिल्ह्यांमध्ये तिचे कार्य सुरू आहे.संस्थेचे राज्य व प्रांतीय घटक स्वतंत्रपणे कार्यरत असून ते राष्ट्रीय संस्थेशी संलग्न आहेत.
सेवानिवृत्तीनंतरही राष्ट्रसेवा — संस्थेची मूलभूत भूमिका
परिषदेचा मूलभूत दृष्टिकोन असा आहे की,सैनिक वर्दीतून निवृत्त होतो,परंतु राष्ट्रसेवेच्या कार्यातून निवृत्त होत नाही.
भारतीय सशस्त्र दलांमध्ये दीर्घकाळ सेवा केल्यानंतर मिळालेले शिस्तबद्ध जीवन,नेतृत्वक्षमता,व्यवस्थापनाचा अनुभव,संघभावना आणि राष्ट्रनिष्ठा या गुणांचा उपयोग
समाजाच्या विविध क्षेत्रांत करता यावा,हा परिषदेच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे.
परिषदेच्या प्रमुख उद्दिष्टांमध्ये—
• माजी सैनिकांना राष्ट्रहिताच्या कार्यात संघटित करणे;
• राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक समरसता आणि अंतर्गत सुरक्षेसाठी माजी सैनिकांच्या अनुभवाचा उपयोग करणे;
• ग्रामीण व दुर्गम भागात शिक्षण,आरोग्य, स्वच्छता आणि सामाजिक विकासासाठी योगदान देणे;
• माजी सैनिक,वीर नारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी कार्य करणे;
• सेवानिवृत्तीनंतर माजी सैनिकांना सन्मानपूर्वक व स्वाभिमानाने पुनर्वसनासाठी सहकार्य करणे;
• शहीद सैनिक आणि युद्धवीरांच्या स्मृती जतन करणे;
• नव्या पिढीमध्ये राष्ट्रभक्ती, कर्तव्यभावना आणि राष्ट्रीय इतिहासाबद्दल जागरूकता निर्माण करणे
यांचा समावेश आहे.
सैनिक कुटुंबांच्या कल्याणासाठी कार्य
परिषदेने २००१ मध्ये 'सैनिक परिवार कल्याण न्यास' (Sainik Parivar Kalyan Nyas) स्थापन केला.युद्ध किंवा दहशतवादविरोधी कारवाईत प्राणार्पण केलेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांसह गरजू माजी सैनिकांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी या माध्यमातून कार्य केले जाते.
माजी सैनिकांच्या मुलांना उच्च शिक्षण,व्यावसायिक व तांत्रिक शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे,शिष्यवृत्ती देणे,तसेच गरजू वीर नार्यांना आर्थिक मदत करणे हे या कार्याचे महत्त्वाचे भाग आहेत.
युद्धवीर आणि शहीद कुटुंबांप्रती कृतज्ञता
परिषदेने विविध प्रसंगी युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत केली आहे.१९९९ च्या कारगिल युद्धानंतर जखमी सैनिकांना रुग्णालयांमध्ये आवश्यक सहाय्य तसेच कारगिल शहीदांच्या कुटुंबांना आर्थिक मदत व 'सन्मानपत्र' प्रदान करण्याचे राष्ट्रीय कार्यही करण्यात आले.२००२ मधील राष्ट्रीय सैन्य मोबिलायझेशनच्या काळात युद्धातील हुतात्मा सैनिकांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यातही परिषदेला जबाबदारी देण्यात आली होती.
राष्ट्रीय इतिहास आणि युवा पिढीशी जोडणारे उपक्रम
परिषदेच्या कार्यात राष्ट्राच्या स्वातंत्र्यलढ्याच्या आणि लष्करी इतिहासाच्या स्मृती जतन करण्यालाही महत्त्व आहे.
एप्रिल १९९७ मध्ये मणिपूरमधील मोइरांग येथून दिल्लीतील लाल किल्ल्यापर्यंत काढण्यात आलेली ध्वज यात्रा हा या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला.या यात्रेतून पुढे नेताजी-आझाद हिंद सेना स्मारक न्यास या उपक्रमाला प्रेरणा मिळाली.
अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद आणि संबंधित संस्था दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती,आझाद हिंद सेना दिवस तसेच अन्य राष्ट्रीय स्मृतिदिन विविध राज्यांमध्ये साजरे करतात.शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास,नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योगदान आणि राष्ट्रासाठी केलेल्या बलिदानाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमांचा उद्देश आहे.
'वीर सैनिक ग्राम गौरव योजना'
परिषदेच्या उल्लेखनीय उपक्रमांमध्ये वीर सैनिक ग्राम गौरव योजना याचाही समावेश आहे.युद्ध अथवा शांततेच्या काळात शौर्य गाजविणाऱ्या वीर सैनिक,शौर्यपदक विजेते आणि शहीदांच्या जन्मगावी त्यांच्या स्मृतीचा सन्मानकरण्याबरोबरच त्या गावाच्या सामाजिक विकासाला चालना देण्याचा या उपक्रमामागील विचार आहे.
२७ वी राष्ट्रीय सभा ही पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचा टप्पा
२७ व्या व्या राष्ट्रीय सर्व साधारण सभे चे उदघाटन मेजर जनरल धनंजय जोशी (AVSM, VSM Commandant Infantry School) ह्यांच्या हस्ते होणार आहे.ह्या वेळेस राष्ट्रीय अध्यक्ष ले जन.विष्णूकांत चतुर्वेदि,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख आणि संस्थेचे मार्गदर्शक प्रदीप जोशी,महाराष्ट्र आणि गोवा चे अध्यक्ष एअर मार्शल प्रदीप बापट आणि इतर राष्ट्रीय आणि राज्याचे अधिकारी आणि सैनिक सदस्य उपस्थित असणार आहे.
कोल्हापूर येथे होणारी २७ वी राष्ट्रीय वार्षिक सर्वसाधारण सभा ही केवळ संघटनात्मक बैठक नसून,देशभरातील पूर्व सैनिकांना एका राष्ट्रीय व्यासपीठावर एकत्र आणणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
या सभेत मागील वर्षातील संस्थेच्या कार्याचा आढावा घेण्याबरोबर
• संघटनात्मक विस्तार व बळकटीकरण
• माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित विषय;
• राज्य व जिल्हा स्तरावरील कार्याचा आढावा;
• सामाजिक व राष्ट्रसेवेतील आगामी उपक्रम👇🏻
• युवा पिढीशी संवाद;
• राष्ट्रीय इतिहास आणि सैनिकांच्या योगदानाविषयी जनजागृती
• ग्रामीण व दुर्गम भागातील सेवा कार्य
• आगामी वर्षातील कार्यक्रमांचे नियोजन
•माजी सैनिकांच्या कॅन्टीन पेन्शन आणि ECHS च्या समस्या ऐकण्या साठी आणि त्यांचे समाधान करण्या साठी दिल्ली हून अधिकृत सैन्य अधिकारी सेना मुख्यालया हून येणार आहेत.हे अधिकारी सैनिकां बरोबर संवाद साधणार आहेत.
पूर्व सैनिकांच्या विविध विषयांवर चर्चा व विचारमंथन केले जाणार आहे.
देशाच्या विविध भागांतून येणारे माजी सैनिक आणि महाराष्ट्रातील स्थानिक माजी सैनिक यांच्यातील संवाद, अनुभवांचीदेवाणघेवाण,परस्पर सहकार्य आणि संघटनात्मक समन्वय हा या राष्ट्रीय सभेचा आणखी एक महत्त्वाचा पैलू असेल.नमस्ते शौर्य फौंडेशन मुंबई तर्फे १९७१ च्या युद्धा चे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनी भरविण्यात येणार आहे.३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सर्व प्रतिनिधींसाठी कलाकारांच्या तर्फे सदाबहार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे.
*कणेरी मठाची निवड —अध्यात्म आणि राष्ट्रसेवेचा संगम*
या राष्ट्रीय अधिवेशनासाठी कोल्हापुरातील श्री क्षेत्र कणेरी मठ यांची निवड ही विशेष महत्त्वाची आहे.अध्यात्मिक परंपरेबरोबरचसामाजिक,शैक्षणिक,ग्रामीण विकास आणि स्वावलंबनाशी संबंधित विविध उपक्रमांसाठी कणेरी मठाची ओळख आहे.म्हणूनच राष्ट्रसेवेची दीर्घ परंपरा असलेल्या माजी सैनिकांचे राष्ट्रीय अधिवेशन अशा सेवा आणि संस्काराच्या भूमीत होत असल्याने या आयोजनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
*समारोप कार्यक्रम*
तीन दिवसीय राष्ट्रीय सभेचा समारोप ४ ऑक्टोबर २०२६ रोजी होणार असून,राज्याचे मंत्री शंभूराज देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.या प्रसंगी देशभरातून सहभागी होणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान,राष्ट्रीय सेवा आणि संघटनात्मक कार्याच्या पुढील दिशेवर विचार तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रसेवेचा संकल्प अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे.
*महाराष्ट्राची भूमिका*
महाराष्ट्राच्या भूमीत होणारी ही राष्ट्रीय सभा राज्यातील माजी सैनिकांसाठीही महत्त्वाची संधी आहे.देशाच्या विविध भागांत कार्यरत असलेल्या माजी सैनिकांच्या संघटनांशी महाराष्ट्रातील माजी सैनिकांचा प्रत्यक्ष संवाद वाढविणे,विविध राज्यांतील कार्यपद्धतींची माहिती सर्वांना देणे व देवाणघेवाण करणे आणि भविष्यातील संयुक्त उपक्रमांना चालना देणे या दृष्टीने या सभेचे महत्त्व अधोरेखित होते.
"राष्ट्र प्रथम –सेवा,साहस आणि सन्मान" या भावनेतून कार्यरत असलेल्या पूर्व सैनिकांना एकत्र आणत,त्यांच्या अनुभव आणि सामर्थ्याचा उपयोग राष्ट्रनिर्माणासाठी करण्याच्या परिषदेच्या प्रयत्नांना २७ वी राष्ट्रीय सभा नवी दिशा देईल,अशी अपेक्षा आहे.
"दिनांक २ ते ४ ऑक्टोबर २०२६ ह्या कालावधीमध्ये श्री क्षेत्र कणेरी मठ,कोल्हापूर, महाराष्ट्र येथे होणाऱ्या
अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेच्या ह्या संमेलनामध्ये देशभरातील सुमारे ३५० राष्ट्रीय
प्रतिनिधी,महाराष्ट्र व गोवा राज्यासह माजी सैनिक उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास ४ ऑक्टोबर २०२६ रोजीप्रमुख पाहुणे राज्याचे मंत्री शंभूराज देसाई असणार आहे" अशी माहिती अखिल
Comments
Post a Comment