ॲड. प्रमोद आडकर यांना श्रीपाल सबनीस संस्कृती सेवा पुरस्कार

ॲड. प्रमोद आडकर यांना श्रीपाल सबनीस संस्कृती सेवा पुरस्कार

पुणे : मनोहारी मैत्र संघ, पुणेतर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने शुक्रवार, दि. २ ऑक्टोबर २०२६ रोजी डॉ. श्रीपाल सबनीस सन्मान व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. ज्येष्ठ विचारवंत, मराठी विश्र्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती असणार असून त्यांचे ‘क्रांतिकारक गांधी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांचा डॉ. श्रीपाल सबनीस संस्कृती सेवा पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. कार्यक्रम सकाळी ११ वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस अध्यक्षस्थानी असणार असून महावितरणचे संचालक राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती मनोहारी मैत्र संघाचे प्रमुख मनोहर कोलते यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*