विसाव्या शतकातील हुकूमशाह’ पुस्तकाचा ११ सप्टेंबरला प्रकाशन सोहळा



*'विसाव्या शतकातील हुकूमशाह’ पुस्तकाचा ११ सप्टेंबरला प्रकाशन सोहळा*

पुणे : ज्येष्ठ विचारवंत व लेखक मा. अशोक कुमार पांडेय लिखित, मधुश्री पब्लिकेशन प्रकाशित आणि मीना शेटे-संभू अनुवादित ‘विसाव्या शतकातील हुकूमशाह’ या महत्त्वपूर्ण पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक मा. संजय आवटे राहणार असून, खासदार अमोल कोल्हे आणि ज्येष्ठ पत्रकार मा. अशोक वानखेडे (दिल्ली) यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. तर एम.पी.सी.सी.चे मुख्य प्रवक्ते मा. अतुल लोंढे तसेच पुस्तकाचे लेखक मा. अशोक कुमार पांडेय यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत आयोजकांच्या वतीने देण्यात आली. यावेळी सचिन पांडुळे, रोहन गायकवाड, तेजस भालेराव, मुस्कान नदाफ, तुषार कांबळे, साईली मनोहर, शाम अष्टेकर (मधुश्री पब्लिकेशन) उपस्थित होते. 

‘विसाव्या शतकातील हुकूमशाह’ या पुस्तकाच्या माध्यमातून विसाव्या शतकातील हुकूमशाहीचा इतिहास, त्यामागील राजकीय-सामाजिक प्रवाह आणि विविध हुकूमशाही व्यवस्थांचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इतिहास आणि राजकारणाचा चिकित्सक अभ्यास करणाऱ्या वाचकांसाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पुस्तक प्रकाशन सोहळ्यास साहित्यप्रेमी, पत्रकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देखील आयोजकांच्या वतीने या प्रसंगी करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

आषाढी वारीनिमित्त कलाकारांची भव्य दिंडी उत्साहात संपन्न

भगवान महावीर जयंतीनिमित्त श्री मनमोहन पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्टच्या वतीने लाडू बुंदी आणि शेव वाटप.

सनातन संस्थेच्या वतीने देशभरात ८१, तर पुणे जिल्ह्यात ८ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ उत्साहात संपन्न!*